02 March 2021

News Flash

पिंपरी-चिंचवड : दिवसभरात २७ पोलीस कर्मचारी व अधिकारी करोनाबाधित

पिंपरी पोलीस ठाण्यातील १० पोलीस कर्मचारी व २ अधिकारी करोना पॉझिटिव्ह

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात  २७ पोलीस कर्मचारी आणि अधिकारी करोनाबाधित आढळले आहेत. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या  संख्येने पोलीस कर्मचारी करोनाबाधित आढळल्याने, पिंपरी-चिंचवडमधील पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, एकूण करोनाबाधित पोलिसांची संख्या आता ९५ वर पोहचली असून, आतापर्यंत यापैकी ३१ जणांनी करोनावर मात केली. तर, उर्वरित ६४ करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर बाब म्हणजे पिंपरी पोलीस ठाण्यात दहा कर्मचारी आणि दोन पोलीस अधिकारी करोनाबाधित आढळले आहेत.

मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या हा दोनशे पेक्षा अधिक येत आहे. तसेच शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांना देखील करोना विषाणूची बाधा होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे  समोर येत आहे. आज दिवसभरात २७ पोलीस कर्मचारी करोनाबाधित आढळले आहेत. यात दोन पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, आत्तापर्यंत करोनामुक्त झालेले ३१ जणांपैकी काही जण पुन्हा कर्तव्यावर रूजू देखील झाले आहेत.

आज दिवसभरात पिंपरी पोलीस ठाण्यात तब्बल १० पोलीस कर्मचारी आणि दोन अधिकारी, भोसरी पोलीस ठाण्यात २ कर्मचारी, वाहतूक शाखा ५  पोलीस कर्मचारी, झोन १ मध्ये दोन तर हिंजवडी, वाकड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी करोनाबाधित आढळले आहेत.

सामान्य नागरिकांबरोबरच करोना महामारीच्या संकट काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील, करोनाचा संसर्ग अधिकच होत आहे. मागील ४८ तासांत २७८ पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत करोनामुळे राज्यात ७१ पोलिसांना जीव गमावावा लागला आहे. सध्या राज्यात १ हजार ११३ पोलीसांवर उपचार सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ३७१ जण करोनामुक्त झाले असून ३०० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर सात जणांचा आज करोनामुळे मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ५ हजार ४९३ वर पोहचली आहे. यापैकी, आत्तापर्यंत ३ हजार ५०९ जण करोनामुक्त झाले आहेत. तसेच करोनामुळे आत्तापर्यंत १११ जणांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 8:57 pm

Web Title: pimpri chinchwad during the day 27 police personnel and officers were corona affected msr 87 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 निकाह…तलाक…हलाला…निकाह… परत हलालाचा प्रयत्न; मुस्लीम महिलांचे हाल काही संपेना
2 हिंजवडी आयटी हबमध्ये उद्यापासून आठ दिवस कडकडीत लॉकडाउन
3 गाळ काढण्याच्या कामात गोलमाल
Just Now!
X