30 September 2020

News Flash

पिंपरी-चिंचवड : दीड महिन्याच्या बाळासह त्याच्या चार वर्षीय भावाने केली करोनावर मात

आईचा अहवाल सुदैवाने निगेटिव्ह आला होता

(प्रतिकात्म छायाचित्र)

पिंपरी-चिंचवडमध्ये पुण्यातील ८१ वर्षीय आजोबांनी करोनावर मात केल्याच्या सकारात्मक बातमीनंतर दीड महिन्याच्या बाळासह चार वर्षाच्या त्याच्या भावानेही करोना विषाणूला हरवलं आहे. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून दोघांची प्रकृती उत्तम आहे. ते संभाजीनगर चिंचवड येथील रहिवासी आहेत.

सविस्तर माहिती अशी की, मुंबईला डिलिव्हरीला गेलेली आई महिनाभराने पुण्याला परत आली होती. त्यानंतर बाळाला ताप आल्यामुळे वाय.सी.एम.रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. तपासणी केली असता दीड महिन्याच्या बाळासह त्याचा चार वर्षीय मोठा भाऊ दोघेही करोना पाॅझिटीव्ह आढळले होते. एवढेच नाहीतर आजोबा सुद्धा पाॅझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. तर आईचा अहवाल सुदैवाने निगेटीव्ह आला होता. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील बालरोग विभागात त्यांच्यावर उपचार केले गेले. आता यातून ते पूर्णपणे बरे झाले आहेत.

या दीड महिन्याच्या बाळासह त्याच्या चार वर्षांच्या भावावर वैद्यकिय अधिष्ठाता डाॅ राजेंद्र वाबळे व डाॅ अनिकेत लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले. यामध्ये बालरोग विभाग प्रमुख डॉ.दीपाली अंबिके, वैद्यकीय अधिकारी डाॅ. संध्या हरिभक्त, डॉ.सीमा सोनी, डॉ सूर्यकांत मुंडलोड,डॉ. नुपूर कत्रे, डॉ.शीतल खाडे ,डॉ.प्राजक्ता कदम, डॉ.गौरव शर्मा, डॉ.सबाहत अहमद, डॉ.अभिजीत ब्याले,डॉ. रिजवना सय्यद, डॉ.कोमल बिजारनिया व सर्व परिचारिका यांचे सहकार्य लाभले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2020 7:41 pm

Web Title: pimpri chinchwad his four year old brother with a one and a half month old baby overcome corona msr 87 kjp 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोना योद्धा नर्सचे १४ दिवसानंतर घरी आगमन; सोसायटीधारकांनी केलं जंगी स्वागत
2 सिलेंडर संपल्याने अंध दाम्पत्याची उपासमार; पोलिसांनी दिला मदतीचा हात
3 पुण्यात कहर : मेडिकल दुकानांना औषध पुरवठा करणाऱ्या ३८ जणांना करोनाचा संसर्ग
Just Now!
X