News Flash

पिंपरी : आठवलेंच्या पत्रकार परिषदेनंतर कार्यकर्ते, पोलीस आणि पत्रकार थोडक्यात बचावले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर कार्यकर्ते,पत्रकार आणि पोलीस थोडक्यात बचावले

(अडकलेली लिफ्ट)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर कार्यकर्ते,पत्रकार आणि पोलीस थोडक्यात बचावले आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांची पिंपरी-चिंचवडमधील आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागे असणाऱ्या एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद होती. पत्रकार परिषद संपल्यानंतर कार्यकर्ते, पत्रकार आणि पोलीस हे उद्वाहनाने(लिफ्टने) खाली येत असताना अपघात झाला. पहिल्या मजल्यावरून लिफ्ट थेट तळमजल्यावर जोरात आदळली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही, पण आठवले स्वतःदेखील अपघात होण्याच्या अगोदर याच लिफ्ट मधून खाली आले होते.

सविस्तर माहिती अशी की, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरी येथील आंबेडकर पुतळ्यामागे एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद होती. जवळपास एका तासानंतर पत्रकार परिषद संपली, काही कार्यकर्ते आणि पोलीस, पत्रकार हे लिफ्ट मधून खाली येत होते. त्याच दरम्यान लिफ्ट अर्ध्यात अडकली, यामुळे काही मिनिटं आतमध्ये सर्वजण अडकले. हॉटेल प्रशासनाने प्रयत्न सुरू केले पण लिफ्ट दुरुस्त होत नव्हती. अखेर अचानक लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर जोरात आदळली. या घटनेमुळे पोलीस कर्मचारी, पत्रकार आणि कार्यकर्ते घाबरले होते. अचानक झालेल्या प्रकारामुळे सर्वजण गोंधळून गेले. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी नसून सर्वजण सुखरूप आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे काही मिनीट अगोदर याच लिफ्टमधून खाली आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2019 6:06 pm

Web Title: pimpri chinchwad lift accident after ramdas athawales pc
Next Stories
1 पिंपरी चिंचवड : ‘डीपी’ला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू
2 शोकाकुल वातावरणात शहीद मेजर शशीधरन नायर यांच्यावर अंत्यसंस्कार
3 वॉर मेमोरियल येथे शहीद मेजर शशीधरन व्ही. नायर यांना मानवंदना
Just Now!
X