पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी आज, शनिवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले. चारही विषय समित्यांच्या सभापतिपदी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.
विधी समिती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती, शहर सुधारणा आणि महिला व बाल कल्याण समित्यांच्या सभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आले. तीन विषय समित्यांच्या सभापतिपदी यापूर्वीच भाजपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती. केवळ औपचारिकता शिल्लक होती. तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी भाजपसमोर राष्ट्रवादीचे आव्हान होते. ऐनवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवार निकिता कदम यांनी माघार घेतली. यामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या सभापतिपदी सुनीता तापकीर यांची निवड झाली.
> विधी समिती: शारदा हिरेन सोनवणे, सभापती, अश्विनी संतोष जाधव, उपसभापती
> क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती: लक्ष्मण सोपान सस्ते, सभापती, बाळासाहेब
ओव्हाळ, उपसभापती
> शहर सुधारणा समिती: सागर बाळासाहेब गवळी, सभापती, शैलेश प्रकाश मोरे, उपसभापती
> महिला व बाल कल्याण समिती: सुनीता तापकीर, सभापती, योगिता ज्ञानेश्वर नागरगोजे, उपसभापती
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 15, 2017 5:21 pm