News Flash

पिंपरीत महापौर विरूध्द राष्ट्रवादी

या वेळी दोन्ही गटात पत्रकारांसमोरच जोरदार वादावादी झाली.

पिंपरीच्या महापौर शकुंतला धराडे यांची राष्ट्रवादीच्याच नगरसेविकांशी पत्रकारांच्या साक्षीने महापौर कक्षातच जोरदार वादावादी झाली.

भाजप-राष्ट्रवादीच्या राजकारणात महापौरांची फरपट

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील राजकारणात ‘सँडविच’ झालेल्या महापौर शकुंतला धराडे यांची गुरुवारी पुन्हा फरपट झाली. सभा तहकूब करण्याच्या मुद्दय़ावरून ‘महापौर विरूद्ध राष्ट्रवादी’ असेच चित्र सभागृहात होते. सभेनंतर महापौर कक्षातही वादाचे पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या नगरसेविका महापौरांना फैलावर घेत असताना जगताप समर्थक नगरसेविका त्यांच्या मदतीला आल्या. या वेळी दोन्ही गटात पत्रकारांसमोरच जोरदार वादावादी झाली.

महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दोन सभांचे कामकाज होणार होते. दुपारी एकची सभा तहकूब झाली. त्यानंतर, चार वाजता होणारी सभाही तहकूब करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता. तथापि, महापौरांनी भाजपशी सलग्न नगरसेविका सीमा सावळे यांना बोलण्याची संधी दिली, त्यावरून वादाला सुरूवात झाली. त्यानंतरच्या चर्चेत सभागृहात बराच गोंधळ झाला. महापौरांवर सभा तहकुबीसाठी दबाव होता. या मुद्दय़ावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महापौरांना चांगलेच फैलावर घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापौरांनी त्यांना जुमानले नाही. राष्ट्रवादीतील नगरसेवक सभागृहातून बाहेर निघून गेले. त्यानंतर, महापौरांना सभा तहकूब करावी लागली. या वादाचे लोण नंतर महापौर कक्षात पसरले. महापौरांपाठोपाठ राष्ट्रवादीच्या नगरसेविका महापौर कक्षात गेल्या आणि वाद घालू लागल्या. महापौरांनी जशास तसे उत्तर देण्यास सुरूवात केली.  राष्ट्रवादीच्या महापौर आणि राष्ट्रवादीच्याच नगरसेविका यांच्यातील वाद वाढत गेला. जगताप समर्थक नगरसेविकांनी महापौरांची बाजू घेत वादात उडी घेतली. हा सगळा गोंधळ पत्रकारांसमोरच सुरू होता. या वादामुळे आगामी काळातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

आचारसंहितेविषयी संभ्रम

आचारसंहितेविषयी असलेली संभ्रमावस्था सभेत मांडण्याचा प्रयत्न काही सदस्यांनी केला. प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांची माहिती सभागृहात दिली. नगरपालिका निवडणुकांपाठोपाठ विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच २३ नोव्हेंबरला पुढील सभा घेण्याचे महापौरांनी जाहीर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 3:52 am

Web Title: pimpri chinchwad mayor against ncp
Next Stories
1 सेनेची स्वबळावर सत्ता येईल – निम्हण
2 ज्योतिषांच्या नादाला लागल्यामुळेच अजित पवारांकडून कुंडल्या काढण्याची भाषा
3 चाकणमधील आगीत चार महिलांसह पाच जणांचा मृत्यू
Just Now!
X