पिंपरी-चिंचवडमध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. परांडे नगरातील मोबाईच्या दुकानात काल रात्री चोरी झाली. चोरट्यांनी २ लाख ३१ हजार रुपये किंमतीचे १५ ते १६ मोबाईल लंपास केले. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी-दिघी मार्गावरील परांडे नगर येथील यादव इलेक्ट्रॉनिक या दुकानामध्ये काल रात्री चोरी झाली. चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. दुकानातील विविध नामांकित कंपन्यांचे १५ ते १६ मोबाईल फोन चोरले. या मोबाईलची किंमत २ लाख ३१ हजार आहे. सकाळी दुकानात चोरी झाल्याचे समजले. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलीस घटनास्थळी पोहोचले. दुकानातील सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक एस. एस. भुजबळ यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 15, 2017 3:45 pm