26 February 2021

News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये करोना वाढला; पालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

गर्दीच्या ठिकाणी काही निर्बंध आणण्याचा विचार

संग्रहित

पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे गेल्या चार दिवसांमध्ये स्पष्ट झालेले आहे. शहरात चार दिवसांमध्ये जवळपास एक हजार बाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ लाख ३ हजार १९८ जण बाधित रुग्ण असून पैकी ९८ हजार २५७ जण ठणठणीत बरे झाले आहेत. तर मृत्यू झालेल्यांची संख्या १८३० इतकी आहे. दरम्यान, शहरातील बंद करण्यात आलेले जम्बो कोविड आणि इतर कोविड सेंटर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असून आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आणखी वाचा- मुंबई, पुण्यानंतर आता नागपुरातही निर्बंध लागू; शाळा, लग्नाचे हॉल बंद राहणार

यावेळी राजेश पाटील म्हणाले की, “गर्दीच्या ठिकाणी काही निर्बंध आणता येतील का यासंबंधी काही पावलं उचलली जाणार आहेत. करोना चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. अगोदर २००० चाचण्या होत होत्या त्या वाढवून ३००० करणार आहोत”. “नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर वापरावे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे,” असं आवाहनदेखील त्यांनी केले.

आणखी वाचा- माझं कळकळीचं आवाहन की,…; राजेश टोपे यांचं रुग्णालयातून महाराष्ट्राला पत्र

पुढे ते म्हणाले की, “आरोग्य कर्मचारी यांना कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आले होते. शासनाच्या निर्देशानंतर कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा ते कोविड सेंटर ठराविक अंतराने सुरू करणार आहोत. आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू करण्याचा निर्णय लवकरच घेऊ. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. महानगरपालिका आणि राज्य प्रशासनाला कोविडचे सर्व नियम पाळून सहकार्य करावे. पुढील सात दिवस नागरिकांनी सहकार्य केल्यास लॉकडाऊन ची परिस्थती उद्भवणार नाही”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 2:39 pm

Web Title: pimpri chinchwad municipal corporation covid centres kjp 91 sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुणे : मराठी इन्स्टाग्राम स्टार समीर गायकवाडची आत्महत्या
2 माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात हजारोंची गर्दी; शरद पवारांसह अनेक नेत्यांची हजेरी
3 पूर्वपरवानगीच्या आदेशाचा फेरविचार
Just Now!
X