News Flash

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या भाजपाकडे

भाजपाचे शीतल शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर बंडखोरी केली होती.

पिंपरी- चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक रंगतदार झाली होती. 

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपाचे नगरसेवक विलास मडिगेरी यांची निवड झाली आहे. त्यांना १२ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांना ४ मते मिळाली. शिवसेना नगरसेवकाचे मतही भाजपाला मिळाले आहे.

पिंपरी- चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक रंगतदार झाली होती.  भाजपाचे शीतल शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर बंडखोरी केली होती. भाजपाचे अधिकृत उमेदवार विलास मडिगेरी यांच्या विरोधात शिंदे यांची लढत होणार असे दिसत असताना ऐनवेळी शीतल शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेत मडिगेरी यांचा विजय सुकर केला. शिंदे यांनी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कलाटे विरुद्ध भाजपाचे विलास मडिगेरी अशी थेट लढत झाली. यात मयूर कलाटे यांना ४ मत तर १२ मत ही भाजपाच्या मडिगेरी यांना मिळाली त्यात शिवसेनेचे राहुल कलाटे यांचे मत भाजपाला मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 2:28 pm

Web Title: pimpri chinchwad municipal corporation standing committee election bjp corporator won
Next Stories
1 पुणे – ढेकूण घालवण्यासाठी पेस्ट कंट्रोल करणं जीवावर बेतलं, दोन तरुणांचा मृत्यू
2 अमोल कोल्हे यांच्या प्रवेशानंतर नाराजीनाटय़
3 महिन्यातून एकदा ‘तेजस्विनी’तून महिलांना विनामूल्य प्रवास
Just Now!
X