News Flash

पिंपरी -चिंचवड : करोनाबाधित रुग्णांकडून जास्त बिल आकारल्याने फिनिक्स रुग्णालयाला नोटीस

खुलासा करण्यासाठी ४८ तासांची दिली मुदत

(संग्रहित छायाचित्र)

सध्या करोना महामारीचे संकट असून खासगी रुग्णालयासह महानगर पालिकेच्या रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांची लूट होत असल्याचं वारंवार समोर आले आहे. ज्यादा दर आकारल्या प्रकरणी शहरातील रहाटणी येथील फिनिक्स रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच ४८तासांत खुलासा करण्याबाबत सांगितले आहे. ही कारवाई महानगर पालिकेच्या पथकाने केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील खासगी रुग्णालयामध्ये कोविड-१९ या आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची येणारी वैद्यकीय खर्चाची बिलं ही अवास्तव रक्कमांची येत आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्याने रुग्णालयांनी आकारलेली खर्चाची बिले ही महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या दरांनुसार असल्याबाबतची तपासणी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने एन.अशोक बाबू, सह आयुक्त, आयकर विभाग, पुणे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या समितीने रहाटणी येथील फिनिक्स हॉस्पिटलकडील १६ रुग्णांच्या वैद्यकीय बिलांची तपासणी केली असता शासन निश्चित दरांपेक्षा जास्त दराने वैद्यकीय बिल आकारणी केल्याचे आढळून आले. त्यामुळे या हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

एन.अशोक बाबू यांच्या वैद्यकीय समितीने फिनिक्स हॉस्पिटलला भेट देऊन तेथील वैद्यकीय बिलांची तपासणी केली असता, हॉस्पिटलने अॅडमिनीस्ट्रेशन, बेड चार्जेस, आयपीडी, इसीजी, २ डी इको, पॅथोलोजी चार्जेस, एक्स रे चार्जेस शासन निश्चित दरांपेक्षा जास्त आकारल्याचे दिसून आले. तसेच विमा संरक्षित रुग्णाकडून जादा रक्कम घेणे व कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार करण्याच्या शासनाच्या सूचना असताना देखील हॉस्पिटलमध्ये सर्व रुग्णांसाठी एकच प्रवेशद्वार असल्याचे समितीस आढळून आले. त्याबाबत देखील रुग्णालय प्रशासनाला तातडीने दोन स्वतंत्र प्रवेशद्वार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आदीबाबत देखील हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांकडून खासगी रुग्णालयांनी ज्यादा वैद्यकीय बिल आकारले असल्यास याबाबत रुग्णांनी medicalbillaudit@pcmcindia.gov.in व medical@pcmcindia.gov.in या ईमेल वर तसेच ८८८८००६६६६ या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 8:47 pm

Web Title: pimpri chinchwad notice to phenix hospital for overcharging corona patients msr 87 kjp 91
Next Stories
1 मास्क न घातलेल्या पुणेकरांकडून तब्बल एक कोटींचा दंड वसूल, पोलिसांची कारवाई
2 पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी आज अखेरची संधी
3 चित्रपटगृह बंद करून अन्य व्यवसायासाठी परवानगी द्यावी
Just Now!
X