X

मुंबईच्या तोतया ‘एसीपी’ला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विनामास्क वाहन चालकांवर कारवाई करत असलेल्या पोलिसांना दाखवले बनावट ओळखपत्र

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी तोतया सहाय्यक पोलिस आयुक्ताला (एसीपी) बेड्या ठोकल्या आहेत. तो मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यकरत असल्याचं सांगत होता. त्याच्याकडून एक मोटार आणि मुंबई पोलिसांचे बनावट ओळखपत्र जप्त केले आहे. प्रवीण लक्ष्मण सूर्यवंशी असं तोतया सहाय्यक पोलीस आयुक्ताचे नाव आहे. याप्रकरणी सुनील शिवाजी गायकवाड यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर आणि वाहतूक चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. निगडी परिसरातील जाधव सरकार या चौकात नाकाबंदी सुरू असताना मोटारीतून येत असलेल्या दोघांनी मास्क न घातल्याने मोटार बाजूला घेण्यास सांगितले. तेव्हा, मोटारीतील एका व्यक्तीने मी मुंबई पोलीस एसीपी असल्याचं सांगितलं. दरम्यान, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. ओळखपत्र दाखविले असता ते बनावट असल्याचा संशय आला. फोटोत त्या व्यक्तीच्या खांद्यावर राजमुद्रा आणि स्टार असल्याचे आढळले. यानंतर पोलिसांनी प्रवीणकडे अधिक चौकशी केली असता ते ओळखपत्र बनावट असल्याचं त्याने कबूल केले. त्यानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

20
READ IN APP
X