News Flash

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोईंच्या बदलीची जोरदार चर्चा !

शहरातील अवैध धंद्यांबद्दल राष्ट्रवादी आमदारांचं मुख्यमंत्री-उप मुख्यमंत्र्यांना निवेदन

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची उचलबांगडी होणार असल्याची पोलीस दलात जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शहरात सुरू असलेल्या अवैद्य धंद्यांविषयी निवेदन दिले होते. यानंतर शहरात बिष्णोईंच्या बदलीची चर्चा सुरु झाली आहे.

सप्टेंबर २०१९ रोजी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर गुन्हेगारी आटोक्यात येईल अस वाटलं होतं. परंतु, तसे काही झाल्याचे निदर्शनास आले नाही. शहरात वाहन तोडफोड, खून, दरोडा, एटीएम फोडणाऱ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मध्यंतरी टोळी वर्चस्वातून एका चा खून झाल्याची घटना देखील घडली होती. दरम्यान, मे महिन्यात ११ खुनाच्या घटनांनी शहराच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.

कोरोना च्या संकटात पोलीस आयुक्तांचे कौतुक ही झाले. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात अवैद्य धंदे, मसाज पार्लर च्या नावाखाली वेश्या व्यवसाय सर्रास सुरू असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी उघड करत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देत पोलीस आयुक्तालयात होत असलेल्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले होते. कोरोनाचा संकटात सोशल डिस्टसिंग, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असे अनेकदा प्रशासनाने बजावले आहे. परंतु, तसे न होता अवैद्य धंदे सुरू असल्याने कोरोना चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता आमदारांनी थेट उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे आगामी काळात पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची उचलबांगडी झालीच तर नवल वाटायला नको.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 8:22 pm

Web Title: pimpri chinchwad police commissioner sandeep bishnoi may be transfer because of increasing rate of crime in city kjp 91 psd 91
Next Stories
1 पुणेकरांच्या चिंतेत भर, ५० कंटेन्मेंट झोनची वाढ; रुग्णसंख्या वाढण्याची भीती
2 पुण्यातील दिव्यांग कुटुंबाची व्यथा; व्यवसाय जोमात असतानाच करोनामुळे उपासमारीची वेळ
3 करोना ड्युटीनंतर घरी आलेल्या पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तांना मुलाकडून अनोखं गिफ्ट
Just Now!
X