08 March 2021

News Flash

पिंपरी: जुगाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचे निलंबन

पुणे पोलीस आयुक्तांची कारवाई

जुगार अड्ड्यावर धाड टाकून जुगाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेले पैसे लंपास करणे आणि त्यांच्याविरोधात कारवाई न केल्याचे प्रकरण पिंपरी-चिंचवडमधील दिघी येथील पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक संतोष काटे, सोमनाथ बोऱ्हाडे, नामदेव वडेकर, विपूल होले, शिवराज कलांडीकर आणि परमेश्वर सोनके अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डुडुळगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या धाडीत त्यांनी जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आणि दिघी पोलीस ठाण्यात आणले. त्यांना अनेक तास पोलीस ठाण्यातच बसवून ठेवले. या धाडीत जुगाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेली ८९ हजारांची रोकड त्यांना परत न करता ती लंपास केली, असा आरोप त्यांच्यावर आहे. याशिवाय ताब्यात घेतलेल्या जुगाऱ्यांविरोधात कडक कारवाई न करता किरकोळ कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले. यावरच न थांबता या पोलीस कर्मचाऱ्यांनी सोडून दिलेल्या जुगाऱ्यांना अनेकदा फोन करून त्यांना कारवाई करण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडून २५ हजार रुपये उकळले. या पोलीस अधिकाऱ्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांनी या सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 5:22 pm

Web Title: pimpri chinchwad six police suspend not action against gamblers and took a bribe
Next Stories
1 जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई न करता पैसे उकळले, एपीआयसह सहा जण निलंबित
2 तुकाराम मुंढे, नको रे बाबा!
3 फिटनेस भत्त्याबाबत पोलिस निरुत्साही
Just Now!
X