News Flash

पिंपरी-चिंचवड : नगरसेविकेच्या मुलाचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू; आत्महत्या की अपघात शोध सुरु

खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना झाला मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेविकेच्या मुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. रात्री उशिरा उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. प्रसन्न शेखर चिंचवडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रसन्न अवघ्या २१ वर्षांचा होता. करुणा शेखर चिंचवडे असे मयत प्रसन्नच्या आईचे नाव असून त्या भाजपाच्या नगरसेविका आहेत. ही घटना रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली आहे.

चिंचवडमधील राहत्या घरात प्रसन्नने वडिलांच्या परवानाधारक पिस्तूलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी रात्री सव्वानऊ वाजता घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पिस्तूलातून गोळी झाडल्यानंतर झालेल्या आवाजामुळे ही घटना उघडकीस आली. जखमी प्रसन्नला तातडीने खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, रविवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे.

रविवारी प्रसन्न कुटुंबातील व्यक्तींसोबत नवी कार खरेदी करण्यासंदर्भात शोरुममध्ये जाऊन आले होते. मात्र, रविवारी रात्री अचानक त्याने पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. प्रसन्न हा शांत आणि मन मिळाऊ स्वभावाचा होता. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल प्रसन्नने का उचलले हे अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, प्रसन्न हा पिस्तूलाशी खेळत असताना चुकून गोळी सुटून तर मृत्यू झाला नाही ना?, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. या दिशेने देखील चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 7:45 am

Web Title: pimpri chinchwad son of corporater died suicide or mistake police is investigating kjp 91 scsg 91
Next Stories
1 Coronavirus – पुण्यात दिवसभरात ४ हजार ४२६ नवीन करोनाबाधित, २८ रुग्णांचा मृत्यू
2 पुणे : देहूत संचारबंदी; तुकाराम बीज सोहळ्यासाठी केवळ ५० लोकांनाच मंदिरात उपस्थित राहण्याची प्रशासनाकडून परवानगी
3 Coronavirus : पुण्यात दिवसभरात ३० रूग्णांचा मृत्यू, ३ हजार ४६३ करोनाबाधित वाढले
Just Now!
X