01 June 2020

News Flash

पिंपरी-चिंचवड : संशयित आरोपी करोना पॉझिटिव्ह; पाच पोलीस क्वारंटाइन

पोलीस आयुक्तालयात आधीच सातजण करोनाबाधित आढळलेले आहेत

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस ठाण्याच्या चौकीत चक्क संशयित आरोपीच करोना पॉझिटिव्ह निघाला असून, यामुळे पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. आधीच पोलीस आयुक्तालयातील ७ जण  हे करोनाबाधित आढळलेले आहेत. यापैकी, एका अधिकाऱ्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एका पोलीस अधिकाऱ्यांमुळे चार जणांना करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर सर्व जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. दरम्यान, दोन भावंडाचा घरगुती वाद पोलीस चौकीपर्यंत पोहचला. तेव्हा एकाची अदखलपात्र तक्रार घेण्यात आली तर दुसऱ्याला नोटीस बजावत समजूत काढून घरी पाठवून देण्यात आले. यापैकी, एकाला सर्दी आणि खोकला झाल्याने, तो औंध येथील जिल्हा रुग्णालयात गेला असता त्याला करोनाचीबाधा झाल्याचं समोर आलं. ही माहिती समजताच  या  संबंधित पोलीस चौकीतील ५ जण क्वारंटाइन झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 5:13 pm

Web Title: pimpri chinchwad suspected corona positive five police quarantine msr 87 kjp 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 पुणे : दोन गुंडांमधील वाद विकोपाला; कोयत्याने वार करून एकाची हत्या
2 शाळांना नव्या वेळापत्रकांचे पर्याय!
3 राज्यात तापमानवाढ
Just Now!
X