News Flash

पिंपरी-चिंचवड : रोहित्र स्फोटात मृत्यू झालेल्या चिमुकलीच्या आईचेही उपचारादरम्यान निधन

एकूण तीन जणींना गमवावा लागला जीव; महावितरण अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

भोसरीमध्ये रोहित्राचा भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील आजीसह नातीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, काल रात्री उशीरा उपचार सुरू असलेल्या चिमुकलीच्या आईचा देखील मृत्यू झाला. तीन दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. या प्रकरणी भोसरी एमआयसीडी पोलिसात निष्काळजीपणा करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दिलीप कोतवाल यांनी फिर्याद दिली आहे.

शारदा कोतवाल वय- ५१ (आजी) , शिवन्या काकडे वय- ४ महिने (नात), हर्षदा सचिन काकडे (आई) अशी मृत्यू झालेल्या तिघींची नावं आहेत. तर, त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी महावितरण अधिकारी सुनील रोटे यांच्यासह इतर जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप कोतवाल यांनी वारंवार महावितरण अधिकाऱ्यांना रोहित्र हलवण्यास सांगितले होते. मात्र, महावितरणने हलगर्जीपणा करत दुर्लक्ष केले. त्यांच्या निष्काळजीपणामुळे  गेल्या आठवड्यात रोहित्राचा भीषण स्फोट होऊन, घडलेल्या दुर्घटनेत कुटुंबातील चार महिन्याची चिमुकली व अन्य दोघींना जीव गमवावा लागला आहे. गेल्या तीन दिवसांपासून गंभीर जखमी असलेल्या हर्षदा यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या, ८० टक्का भाजल्याचे पोलिसांनी सांगितले होते. अखेर रात्री त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी महावितरणचे अधिकारी सुनील रोटे आणि इतर जबाबदार असलेले अधिकारी यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 11:46 am

Web Title: pimpri chinchwad the mother of little girl who died in the rohitra blast also died during treatment msr 87kjp 91
Next Stories
1 राज्यातील व्यवसाय सुलभतेसाठी जाचक अटी कमी करण्याची गरज
2 लायगुडे रुग्णालयात रुग्णांची गैरसोय
3 लोकजागर :  करोनाकाळातील गणंग
Just Now!
X