30 September 2020

News Flash

पिंपरी- चिंचवड पोलीस आय़ुक्तालयासमोर दोघांवर प्राणघातक हल्ला

गुरुवारी रात्री पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर अमोल वाल्हे आणि अप्पासाहेब कदम या तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

संग्रहित छायाचित्र

पिंपरी- चिंचवडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर रुप धारण करत असून गुरुवारी रात्री पोलीस आयुक्तालयासमोरच दोन जणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. किरकोळ वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

गुरुवारी रात्री पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर अमोल वाल्हे आणि अप्पासाहेब कदम या तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ऍंथोजी फ्रान्सिस आणि रॉबिन फ्रान्सिस या दोघांनी हा हल्ला केल्याचे समजते. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादानंतर आरोपींनी कोयत्याने दोघांवर हल्ला केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्तालयासमोरच कोयत्याने हल्ला करण्याची मजल आरोपींनी गाठल्याने शहरात पोलिसांचा धाक उरला की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2018 11:00 am

Web Title: pimpri chinchwad two person attacked near police commissioner office
Next Stories
1 जंगलातील सांबर आढळले पुण्यातील रस्त्यावर
2 परवाना नसताना मद्यविक्री केल्यास कारवाई अटळ
3 नाटय़गृहांमध्ये स्नेहसंमेलने, कार्यक्रम!
Just Now!
X