पिंपरी-चिंचवड शहरात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील दोन ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. आज नेहरू नगरमध्ये जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत असलेल्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देत कामाची पाहणी केली. दरम्यान, राज्यात कामगारांचा तुटवडा होत असल्याचे कामगार कसे आणले जात आहेत याची माहिती घेत असताना मराठी कामगार आहेत का याची आवर्जून विचारणा अजित पवार यांनी केली आहे.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, यांच्यासह राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांचा आकडा 26 हजार पार झाला आहे. रुग्णाची संख्या लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या परिसरात दोन जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत आहेत. दरम्यान, नेहरू नगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये 616 ऑक्सिजन युक्त आणि 200 आयसीयू बेड असणार आहेत अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड सेंटर ची पाहणी करत असताना उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटर मध्ये कामगार कोठून आणले जातात, कसे आणले जातात याची चौकशी करत असताना मराठी कामगारांची अजित पवार यांनी आवर्जून चौकशी केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, राजस्थान आणि महाराष्ट्रातील कोकण आणि मुंबई मधील कामगार कोविड सेंटर उभारत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तेव्हा, काही ठिकाणी बस ने कामगारांना आणलं जात आहे असं सांगितले