06 March 2021

News Flash

पिंपरीत पतंगाच्या मांजामुळे डॉक्टरचा मृत्यू: २० मिनिटे ती वेदनेने विव्हळत होती, पण…

कासारवाडीत नाशिक फाटा पुलावर डॉ. कृपाली निकम (वय २६) या तरुणीचा लटकणाऱ्या पतंगाच्या मांजामुळे मृत्यू झाला.

घटनेतील प्रत्यक्षदर्शी सिद्धार्थ बोरावके यांनी 'लोकसत्ता ऑनलाइन'ला त्या वेळी नेमके काय झाले, याची माहिती दिली.

पिंपरीत लटकणाऱ्या पतंगाच्या मांजामुळे एका डॉक्टर तरुणीला रविवारी संध्याकाळी प्राण गमवावे लागले असून तब्बल २० मिनिटे ती तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. मात्र, मदतीसाठी एकही वाहन थांबले नाही, अशी माहिती समोर आली असून वेळीच मदत मिळाली असती तर कदाचित तिचे प्राण वाचू शकले असते, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

कासारवाडीत नाशिक फाटा पुलावर डॉ. कृपाली निकम (वय २६) या तरुणीचा लटकणाऱ्या पतंगाच्या मांजामुळे मृत्यू झाला. कृपाली या रविवारी दुचाकीवरुन पिंपळे सौदागरकडून भोसरीकडे जाताना ही घटना घडली. या घटनेतील प्रत्यक्षदर्शी सिद्धार्थ बोरावके यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला त्या वेळी नेमके काय झाले, याची माहिती दिली. ते म्हणाले, डॉ. कृपाली या माझ्या समोरच गाडीवरून अचानक कोसळल्या. त्यांच्यात आणि माझ्यात काही मीटरच अंतर होतं. जेव्हा मी त्यांच्या मदतीला गेलो तेव्हा त्यांच्या गळ्याला पतंगाचा मांजा अडकला होता. यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणावर होत होता.  मी मदतीसाठी अनेक वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीच थांबायला तयार नव्हते. २० मिनिटानंतर एक गाडी थांबली. शेवटी त्यांना खासगी रुग्णालयात नेले. त्यांना रुग्णालयात दाखल करुन मी तिथून निघून गेलो. आज त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी गेलो असता त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. ते ऐकून मला धक्काच बसला, असे त्यांनी सांगितले.

अपघातानंतर तिथून जाणाऱ्या वाहनचालकांनी वेळीच मदत केली असती तर डॉ.कृपाली यांचा जीव वाचला असता. मात्र त्या २० मिनिटे जखमी अवस्थेत पडून होत्या.आणि मी मदतीची याचना करत होतो. त्यांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा गळा कापला असल्याने बोलता आले नाही, असे सिद्धार्थने सांगितले.

पिंपरीकरांनी वेळीच कृपालीची मदत केली असती तर देवदूत समजल्या जाणाऱ्या डॉक्टरलाच मदतीअभावी जीव गमवावा लागला नसता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2018 10:51 am

Web Title: pimpri doctor dies kite string slashes her throat no one came forward to help eye witness
Next Stories
1 सायकल दुरूस्ती करून तिनही मुलींना उच्च शिक्षण देणाऱ्या सायरा सय्यद
2 पिंपरी-चिंचवडमध्ये पतंगाच्या मांजाने गळा कापल्याने डॉक्टर तरुणीचा मृत्यू
3 शहरात खासगी रुग्णालयांतील अतिदक्षता विभाग ‘हाऊसफुल्ल’ 
Just Now!
X