08 March 2021

News Flash

पत्नीला जेवणातून दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, पतीविरोधात गुन्हा

राहटणीत राहणाऱ्या संदीप पवारचे गेल्या वर्षभरापासून पत्नीसोबत खटके उडत होते. संदीपची पत्नी २८ वर्षांची असून ती बँकेत काम करते.

प्रतिकात्मक छायाचित्र

माहेरुन हुंडा घेऊन ये, असा तगादा लावणाऱ्या पतीने पत्नीला जेवणातून गर्भपाताच्या गोळ्या देत तिचा गर्भपात घडवून आणल्याची घटना पिंपरी- चिंचवडमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संदीप पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राहटणीत राहणाऱ्या संदीप पवारचे गेल्या वर्षभरापासून पत्नीसोबत खटके उडत होते. संदीपची पत्नी २८ वर्षांची असून ती बँकेत काम करते. तर संदीप हा चालक म्हणून काम करतो. माहेरुन पैसे घेऊन ये, असा तगादा संदीपने पत्नीकडे लावला होता. यातूनच तो पत्नीला मारहाण करायचा. संतापजनक बाब म्हणजे, त्याने पत्नीला जेवणातून गर्भपाताच्या गोळ्या देत तिचा गर्भपातही घडवून आणला.

गेल्या काही दिवसांपासून संदीप हा पत्नीला हडपसर येथे राहण्यास आग्रह करत होता. मात्र पत्नी काळेवाडी येथे राहात होती. यावरुनही दोघांमध्ये भांडण होते. याप्रकरणी महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 4:43 pm

Web Title: pimpri husband gave abortion pill to wife through meal
Next Stories
1 फर्ग्युसनचं प्रवेशद्वार सत्यनारायण पूजेनं ‘पतित पावन’
2 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षकांना चारचाकी!
3 पुण्यात मौलवीकडून १९ वर्षीय तरूणीवर अत्याचार
Just Now!
X