News Flash

पिंपरी : आयपीएल सामन्यांवर सट्टा, दोन आरोपी अटकेत

२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरीमध्ये आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून पोलिसांनी २४ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लालचंद शर्मा आणि जयरामदास फोटयानी अशी या आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपी चारचाकी गाडीतून फिरत सट्टा स्विकारत होते अशी माहिती पोलिसांनी दिली.

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन व्यक्ती आयपीएल सामन्यांवर बेटींग करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पावलं उचलत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांच्या पथकाने घटनास्थळी छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी ४ मोबाईल, १ वही, पेन, ५ हजार रुपये रोख आणि इनोव्हा गाडी असा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनीयम कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 5:02 pm

Web Title: pimpri police arrest 2 persons while betting on ipl matches kjp 91 psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : पाठीमागे राहून युद्ध जिंकलं जात नाही ! धोनीच्या नेतृत्वावर अजय जाडेजाची परखड टीका
2 रैना IPL मध्ये पुनरागमन करणार का?? CSK चे सीईओ म्हणतात…
3 IPL 2020 : आता ग्लुकोज पिऊन मैदानात या, CSK ला ‘विरु’चा टोला
Just Now!
X