पिंपरीत व्यापाऱ्याची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती होती. परंतु ही हत्या दोन लाख रुपये मागण्यावरून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.  दोन मुलांची फी भरायची असल्याने आरोपीने मयत साबण व्यापारी प्रदीप विरुमन हिंगोरानी यांच्याकडे दोन लाख रुपये देण्याची विनंती केली. मात्र, बराच वेळ विनवणी केल्यानंतर त्याने पैसे न दिल्याने हताश झालेल्या आरोपी सचिन भालेराव याने शेजारी असलेला टॉवेल घेतला आणि व्यापाऱ्याचा गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी सचिन भालेराव याला पिंपरी पोलिसांनी अटक केली असून १४ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात अाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत प्रदीप विरुमन हिंगोरानी (वय-५१ रा.पिंपरी मार्केट) यांचा साबणाचा व्यवसाय होता.  त्रयस्थ व्यक्तीने आरोपी सचिन भालेराव (वय-३३ रा.सोलापूर) याची ओळख साबण व्यापाऱ्याशी करून दिली होती. तसेच याच्याकडे नेहमी पैसे असतात असं आरोपीला सांगण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून आरोपी सचिन याचे हलाकीचे दिवस सुरू होते, त्याच्यावर कर्ज आणि दोन मुलांच्या शाळेची फि भरायची असल्याने मोठं आर्थिक संकट आलं होतं. आरोपीची पत्नी मावळ येथे परिचारिका म्हणून काम करते, तिला महिना आठ हजार रुपये मिळतात, त्यामुळे घर भागत नव्हतं.  तर आरोपी सचिन हा कंपनीशी निगडित काम करायचा त्यामुळे त्याला महिन्याकाठी लाख भर रुपये मिळायचे परंतु तेही येन ठप्प झालं.

दिनांक १ मे रोजी मध्यरात्री साबण व्यापारी प्रदीप विरुमन हिंगोराणी यांच्या निवासस्थानी जाऊन आरोपी सचिन भालेराव याने दोन लाख रुपये देण्याची विनवणी केली.  बराच वेळ झाला तरी आरोपी सचिन हा विनवणी करत होता. अखेर पैसे न दिल्याने हताश झालेल्या सचिनने शेजारी असलेल्या टॉवेलने साबण व्यापारी याचा गळा आवळून हत्या केली आणि घरात असलेले ३८ हजार रुपये घेऊन पळ काढला. परिसरातील सीसीटीव्हीत हा सर्व प्रकार कैद झाला. त्यानुसार तपास करत आरोपी सचिनला सोलापूर येथून अटक करण्यात आली.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे,पोलीस उप आयुक्त गणेश शिंदे,सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील,वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव,गुन्हे पोलीस निरीक्षक मसाजी काळे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास मुंढे,पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे,सागर पाटील,आदींनी केली आहे.