News Flash

पिंपरीत ‘शिवडे, I Am Sorry’ चे ३०० फलक लावणारा ‘तो’ प्रियकर सापडला

पिंपरीतील पिंपले सौदागर येथे प्रेम प्रकरणाकून 'shivade i am sorry' असे फलक लागले आहेत.  प्रेम प्रकरणातून ही बॅनरबाजी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पिंपरीत ‘शिवडे, I Am Sorry’ चे ३०० फलक लावणारा ‘तो’ प्रियकर सापडला

रस्त्यावर नेत्यांच्या वाढदिवसाचे, पक्षाच्या कार्यक्रमाचे, लग्नाच्या वाढदिवसाचे ते अगदी घरातील पाळीव प्राण्याला शुभेच्छा देणारे फलक तुम्ही बघितले असतील. पण पिंपरीतील पिंपले सौदागर येथे प्रेम प्रकरणातून ‘shivade i am sorry’ असे फलक लागले असून ही बॅनरबाजी सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात ‘shivade i am sorry’ असे फलक लागले आहेत. प्रेम प्रकरणातून ही बॅनरबाजी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. निलेश खेडेकर असे पुण्यातील प्रियकराचे नाव असून त्याने मित्र आदित्य शिंदेला shivade i am sorry नावाचे फलक लावायला सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आदित्यने छोटे आणि मोठे असे ३०० फलक लावल्याचे पोलिसांना सांगितलं आहे. याप्रकरणी त्यांना विनापरवाना फलक लावल्या प्रकरणी ७२ हजार रुपयांचा दंड बसू शकतो, याप्रकरणी अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत. प्रेयसी मुंबईहून पुण्याला येणार असल्याने त्याने हे फलक लावले होते.

हे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून बॅनरचे छायाचित्रही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे बॅनर कोणी लावले, ही ‘शिवडे’ कोण आहे, यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. पिंपळे सौदागर येथे मोठ्या प्रमाणावर उच्चभ्रू वसाहती असून संगणक अभियंते राहतात. या बॅनरबाजीमुळे त्या प्रेमवीराला आता ‘शिवडे’ची माफी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

शिवार गार्डन येथील बीआरटी मार्गाच्या लगत असलेल्या विजेच्या खांबांवर हे फलक लावण्यात आले असून त्याने एकूण ३०० फलक लावले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2018 3:02 pm

Web Title: pimpri shivade i am sorry banner in pimple saudagar area people curious photos viral
Next Stories
1 Kerala Floods: हरवलेल्या व्यक्तिंचा शोध घेणारं गुगल पर्सन फाइंडर
2 ७० लाखांचे न्यूडल्स चोरीला, साडेतीन लाख पाकिटांचं चोर करणार तरी काय?
3 VIDEO : पुरस्कार सोहळ्यात ‘त्या’ चिमुरड्याला उचलून घेणाऱ्या अटलजींना पाहिलं का?
Just Now!
X