News Flash

पुण्यात व्यावसायिकाची छातीत गोळी झाडून आत्महत्या

घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट

हिमाचल प्रदेशमधील मॅक्लोडगंज येथील १८ शीख रेजिमेंटच्या एका जवानाने आपल्या दोन सहकारी जवानांवर गोळ्या झाडल्या. नंतर स्वत:वर गोळी झाडून त्याने आत्महत्या केली.

पुण्यातील हडपसर येथील एका व्यावसायिकाने कार्यालयाच्या केबिनमध्ये स्वत:च्या छातीत गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. हडपसर पोलीस याचा तपास करीत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, अरविंद फाळके (वय ५५) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. हडपसर येथील कै. विठ्ठलराव तुपे पाटील नाट्यगृहाजवळ फाळके यांची एक फायनान्स कंपनी आहे. ते आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ऑफिसमध्ये आले. त्यांनी घरून आणलेला जेवणाचा डब्बाही खाला. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना मी झोपतो असे सांगून ते आपल्या केबिनमध्ये गेले काही वेळानंतर त्यांनी छातीत गोळी झाडली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती कळताच हडपसर पोलिसांनी तत्काळ त्यांच्या कार्यालयात धाव घेतली. पोलीस या प्रकरणी माहिती घेत आहेत. मात्र, फाळके यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांत पुण्यात व्यावसायिकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. आत्महत्यांच्या या वाढत्या प्रकारांमुळे चिंता व्यक्ती केली जात आहे. पुण्यातील शिवणे या ठिकाणी असलेल्या पोकळेनगरमध्ये निलेश चौधरी या व्यावसिकाने कर्जबाजारीपणा, नैराश्य या सगळ्याला कंटाळून आपल्या दोन मुलींना आणि पत्नीला विष दिले होते. तसेच स्वतः आत्महत्या केली होती. नैराश्यातून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट निलेश चौधरींच्या खिशात आढळून आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 7:51 pm

Web Title: placing bullet fire in chest suicide by professional at pune
Next Stories
1 पिंपरीतल्या उच्चशिक्षीत महिलांना फेसबुकवरुन लाखोंचा गंडा, नायजेरियन इसम पोलिसांच्या जाळ्यात
2 काँक्रिटीकरणाची कामे थांबेनात
3 शहरातील बँकांमध्ये १२९ आधार केंद्रे
Just Now!
X