04 March 2021

News Flash

क्रिकेट सामना सुरू असताना मैदानावरच खेळाडूचा मृत्यू

हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मैदानावर कोसळले

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात क्रिकेटचा सामना सुरू असतानाच, मैदानात हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूचा मृत्यू झाल्याची घटना घडली. महेश (बाबू) नलावडे (वय ४४) असे या मृत खेळाडूचे नाव आहे.

जाधववाडी येथे मयुर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान, आज(बुधवार) ओझर संघ व जांबुत संघ यांच्यात सामना सुरू होता. ओझर संघाचे टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत खेळाडू व धोलवड गावचे रहिवासी असलेले महेश (बाबू) नलावडे हे फलंदाजीसाठी मैदानात उतरलेले होते. त्यांचा सहकारी फलंदाजी करत असल्याने ते विरुद्ध दिशेने अंपायर जवळ उभे होते, याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते मैदानावर कोसळले. यानंतर अन्य सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने नारायणगाव येथील खासगी रुग्णालत हलवले, पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 9:04 pm

Web Title: player dies on the field during a cricket match msr 87 kjp 91
Next Stories
1 “…तर पुण्यात ‘ते’ चार भाग कंटेन्मेंट झोन करणार”
2 पुणे: गजानन मारणेनंतर शक्ती प्रदर्शन करणारा कुख्यात गुंड शरद मोहोळला अटक
3 पिंपरी-चिंचवड: कडाक्याच्या थंडीत कोविड योद्ध्यांचे बेमुदत उपोषण
Just Now!
X