करोना संकटामुळे लॉकडाउन जाहीर केल्यानंतर धीम्या गतीने निर्बंध शिथील करण्यात आले. पण आता पुन्हा एकदा राज्यात लॉकडाउन निर्माण होण्याचं संकट निर्माण झालं असून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून तसे संकेत दिले जात आहेत. एकीकडे करोनाचा प्रभाव पुन्हा एकदा वाढत असताना दुसरीकडे लस तयार करण्यासाठी वेगाने काम सुरु आहे. पुण्यातील सिरम इन्सिट्यूटकडे सध्या सर्वांचं लक्ष असून अदर पूनावाला यांनी जानेवारी अखेरपर्यंत लसीचे १० कोटी डोस तयार असतील असं सांगितलं आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी करोना लसीच्या प्रगतीसंबंधी माहिती घेण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविड लस तयार करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ९८ देशांचे राजदूत २७ नोव्हेंबर रोजी भेट देण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासनाची बैठक झाली आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमनी सौरभ राव यांची भेट घेत दौऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींचा दौरा अद्याप प्राप्त झाला नसल्याचं कळत आहे.

Anant Ambani and Radhika Marchant pri Wedding
Video : जामनगरमध्ये व्हीआयपी पाहुण्यांसाठी अंबानी कुटुंबाने उभारले आलिशान तंबू, आतील सोयी बघून तुम्हीही व्हाल थक्क
Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
Delhi metro catches fire incident video goes viral
दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरील VIDEO व्हायरल; प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे असताना घडलं भयंकर…
Gutkha smuggler Israr Mansoori in police custody nashik
गुटखा तस्कर इसरार मन्सुरी यास पोलीस कोठडी

सिरम इन्सिट्यूटचे अदर पूनावाला यांनी जानेवारी अखेरपर्यंत कोविडशिल्ड करोना लसीचे १० कोटी डोस तयार असतील अशी माहिती एनडीटीव्हीशी बोलताना दिली आहे. काही ठराविक परिस्थितींमध्ये कोविडशिल्ड लस ९० टक्के परिणामकारक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सध्याच्या घडीला करोना लसीचे दोन डोस घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. अदर पूनावाला यांनी यावेळी करोना लसीचे डोस घेण्यासाठी किती किंमत मोजावी लागेल याचाही खुलासा केला आहे. “मेडिकलमधून खरेदी केल्यास एका डोससाठी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र सरकार प्रत्येक डोससाठी २५० रुपये खर्च करत ९० टक्के पुरवठा खरेदी करणार आहे,” अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे.

अदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने करोना लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारसोबत करार केला असून आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे.

“भारतात लस उपलब्ध होण्यासाठी अजून दोन ते तीन महिने लागतील. जानेवारीपर्यंत आपल्याकडे किमान १० कोटी डोस तयार असतील. सरकारने जुलैपर्यंत ३० कोटींचं टार्गेट ठेवलं आहे. आम्ही किंमत ठरवत असून १००० रुपयांपर्यंत उपलब्ध असेल. खासगी मार्केटसाठी ५०० ते ६०० रुपये असणार आहे. तर सरकारसाठी २५० किंवा त्यापेक्षा कमी असेल,” अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे.

अदर पूनावाला यांनी यावेळी सर्वसामान्यांना लस उपलब्ध होण्यासाठी मार्चपर्यंत वाट पहावी लागेल असंही सांगितलं आहे. मार्चच्या आधी मार्केटमध्ये १० टक्के डोस उपलब्ध केले जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत लस वितरण सरकारच्या अखत्यारित राहील असं त्यांनी सांगितलं. “सर्वसामान्यांना सहजपणे लस उपलब्ध होणार आहे. जर पात्र असतील तर त्यांनी सरकारी केंद्रावर जाऊन घ्यावी लागेल, अन्यथा त्यांना मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे,” असं ते म्हणाले आहेत.

मोदींची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
करोना लस वाटपासंबंधीचं धोरण तसंच देशातील अनेक राज्यांमध्ये नव्याने करोना रुग्ण आढळू लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री तसंच राज्याचे इतर प्रतिनिधी आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग दोन बैठका होतील. पहिल्या बैठकीत नरेंद्र मोदी करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळू लागले आहेत अशा आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. नंतर इतर राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशासोबत चर्चा असेल. या बैठकीत करोना लस वाटपाच्या धोरणासंबंधी नरेंद्र मोदी चर्चा करतील.