पुणे महानगरपालिकेची निवडणूक शांततामयरित्या पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने आणि पोलीस विभागाने विशेष प्रयत्न केले. मात्र यंदाच्या निवडणुकीत काही ठिकाणी अनुचित प्रकार घडला. यामुळे नागरिकामध्ये कमालीची नाराजी पाहण्यास मिळाली. तरी पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ५५.५० टक्के इतके मतदान झाले आहे. या विषयी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी माहिती दिली.

या निवडणुकीबाबत महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले, की पुणे महानगरपालिकेच्या २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शहरात २६ लाख ३४ हजार ७९८ मतदार असून त्यापैकी १४ लाख १० हजार ९७४ मतदारांनी मतदान केले आहे. या आकडेवारी वरून ५५ टक्के मतदान करण्यात आले आहे. तसेच बाणेर, बालेवाडी आणि पाषाण या प्रभाग क्रमांक ९ मध्ये ५५.९० टक्के मतदान झाले आहे.

प्रभाग १५ तील शनिवार पेठ सदाशिव पेठ यामध्ये सर्वाधिक ६२.५१ टक्के इतके मतदान करण्यात आले आहे. त्याचबरोबर यंदाच्या महापालिका निवडणुकीदरम्यान काही ठिकाणी मतदार चिठ्ठ्या वेळेमध्ये मतदारापर्यंत देण्यास पोहचल्या गेल्या नाहीत. यामुळे नागरिकांनी त्रासाला देखील सामोरे जावे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दुपारी चार नंतर काही प्रभाग केंद्रावर गर्दी देखील वाढली. त्यामध्ये हडपसर आणि बोपोडीचा भाग असून त्या मतदार केंद्रावर रात्री ९ वाजेपर्यंत मतदान चालले असल्याची माहिती त्यांनी दिली.