11 December 2017

News Flash

लोकांना मूर्ख बनवण्याचा शिवसेना-भाजपचा धंदा: राज ठाकरे

पुण्यात जाहीर सभा

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: March 21, 2017 5:49 PM

Raj Thackeray : जनतेला दिलेल्या आश्वासनांचा मोदींना विसर पडला आहे, हे सांगताना राज यांनी उपस्थितांना एक विनोदी किस्सा सांगितला.

शिवसेना-भाजपच्या प्रचारसभा आहेत की आखाडा हाच प्रश्न पडत आहे, असे सांगून लोकांना मूर्ख बनवण्याचा शिवसेना आणि भाजपचा धंदा आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील जाहीर प्रचारसभेत केली. नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने ७७ गुंडांना उमेदवारी दिली, असेही राज म्हणाले.

काय म्हणाले राज ठाकरे?

– नाशिकमध्ये ७७ गुन्हेगारांना भाजपने उमेदवारी दिली

– १९५२ साली जन्माला आलेल्या भारतीय जनता पक्षाला अजूनही उमेदवार सापडत नाहीत, ही वस्तुस्थिती

– २०१४ सालची परिस्थिती आता राहिलेली नाही

– हल्लीच्या तरूणांना पाकिटं मिळाली की ते दुसऱ्या पक्षात जायला तयार होतात.

-शिवस्मारकाच्या भूमिपूजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंकडे ढुंकूनही पाहिले नाही

– सरकारमधून बाहेर पडण्याची वाट कसली पाहता?

-शिवसेना आणखी किती अपमान करून घेणार?

-नाशिकमध्ये जे पाच वर्षांत केले, ते यांना गेल्या २५ वर्षांत जमले नाही.

– नाशिक शहराचा पुढील ४० वर्षांचा पाणीप्रश्न सुटणार

-नाशिक शहरातील कामांचे स्लाईड शोद्वारे सादरीकरण

– पुण्यात भाजपचे उमेदवार पक्षातील जुने नेते ठरवत नाहीत. एक बिल्डर ठरवतो. निष्ठावानांना तिकीट नाही

– भारतीय जनता पक्ष एकेक उमेदवार फोडण्यासाठी ५० लाख ते १ कोटी रुपये देत आहे.

– शिवसेना, भाजपकडे सांगण्यासारखे एकही काम नाही. त्यामुळे ते एकमेकांशी भांडून तुम्हाला फसवत आहेत

– पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी १५ वर्षे, मुंबईत सेना-भाजप २५ वर्षे सत्तेत आहेत. इतकी वर्षे सत्तेत असणाऱ्यांना तुम्ही प्रश्न विचारणार आहात की नाही?

– कुठलीही कामे न करता वर्षानुवर्षे सेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीला मते कशी मिळतात? नाशिकमध्ये सत्तेत आल्यावर विचारता की काय केले नाशिकमध्ये?

– मतदान करताना तुम्ही जर पुढच्या पिढ्यांना काय मिळणार आहे याचा विचार करणार नसाल, तर मग काय उपयोग. मग ही शहरे अशीच बर्बाद होणार

– शहरातील नागरिकांना उत्तम सोईसुविधा देणे, सुंदर बनवणे, घडवणे हे माझे पॅशन

– नाशिकमध्ये ५ वर्षांत ५६० किलोमीटरचे रस्ते बांधले

– नाशिकची पुढील ४० वर्षांची पाण्याची गरज भागवण्यासाठी मुकणे धरणातून थेट जलवाहिनी टाकली आहे. २० लाख लिटरच्या १७ टाक्या बांधल्या

-डम्पिंग ग्राउंडचा त्रास जसा इतर शहरात असतो, तसा नाशिकमध्ये पण होता, पण आम्ही तिथे घनकचऱ्यातून खत प्रकल्प उभारला

– नाशिकमध्ये कचरा उचलण्यासाठी जीपीएस यंत्रणेने सुसज्ज घंटागाड्या धावू लागल्यात

– नाशिकमध्ये लहान मुलांना ट्रॅफिकचे धडे मिळावेत म्हणून ‘चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क’ उभारले

– बाळासाहेबांचे स्मारक कोणी पहिले, केले या वादात मला पडायचे नाही. मला जे योग्य वाटले ते स्मारक नाशिकमध्ये उभारले

– बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने नाशिकमध्ये ऐतिहासिक शस्त्र संग्रहालय उभारले

– बोटॅनिकल गार्डनचा कायापालट व्हावा यासाठी रतन टाटांना अर्थसहाय्य करण्याची विनंती केली. त्यांनी तत्काळ मान्यता देत, १४ कोटी रुपये दिले.

First Published on February 16, 2017 8:21 pm

Web Title: pmc election 2017 live raj thackeray speech in pune campaign rally