News Flash

एकाच मतदान यंत्रात दोन ‘बॅलेट’मुळे संभ्रमाची शक्यता

मतदान यंत्रे कमी असल्याचा परिणाम

मतदान यंत्रे कमी असल्याचा परिणाम

दहा महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाचवेळी आल्या आहेत. महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभागपद्धती असून उमेदवारांच्या तुलनेत मतदान यंत्रांची (ईव्हीएम मशीन) संख्या कमी असल्याने एकाच मतदान यंत्रावर दोन बॅलेट लावण्याची नामुष्की निवडणूक आयोगावर आली आहे. अ आणि ब गटातील उमेदवार एका मतदान यंत्रावर तर क आणि ड गटातील उमेदवार दुसऱ्या मतदान यंत्रावर अशी मतदानाची पद्धत असल्याने चार यंत्रे गृहीत धरुन मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांचा मतदानावेळी गोंधळ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मतदान यंत्रांच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली संभ्रमावस्था अद्याप कायम आहे.

यंदा महापालिका निवडणुका प्रथमच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होत आहेत. १६२ जागांसाठी तब्बल १ हजार ४६२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पुण्यात २६ लाख ३० हजार मतदार असून मतदानासाठी ३ हजार ४३२ मतदान केंदं्र नियोजित करण्यात आली आहेत. त्यातच राज्यात दहा महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मतदान यंत्रांची कमतरता आहे. पुण्यात केवळ १० हजार ९९९ मतदान यंत्रे आणि ४ हजार मतमोजणी यंत्रे तैनात असणार आहेत. मतदान यंत्रांची कमतरता असल्याने सर्वच प्रभागात स्वतंत्र यंत्रावर मतदान होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, त्या ठिकाणीच चार स्वतंत्र मतदान यंत्रे देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने महापालिकेला दिल्या आहेत. त्यानुसार पंधरा प्रभागात दोन, चोवीस प्रभागांत तीन आणि केवळ दोन प्रभागांत स्वतंत्र चार मतदान यंत्रे आयोगाच्या आदेशानुसार निश्चित करण्यात आली आहेत.

मतमोजणीसाठी ३ हजार नऊशे यंत्रे कार्यान्वित असणार आहेत. मात्र, एकाच मतदान यंत्रावर दोन जागांसाठी मतदान झाले असल्यास त्याची मोजणी कशाप्रकारे होईल, याबाबत अद्यापही संभ्रमावस्था आहे. चार सदस्यीय प्रभाग झाल्यापासून निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नसल्याने मतदान आणि मतमोजणी याबाबत सावळागोंधळ कायम आहे.

मतदान केंद्रात एका मतदान यंत्रावर दोन बॅलेट असणार आहेत. परंतु अ, ब, क आणि ड गटांसाठी अनुक्रमे पांढरी, गुलाबी, पिवळी आणि निळी मतपत्रिका असणार असल्याने मतदारांमध्ये गोंधळ, संभ्रम होणार नाही. याबाबत निवडणूक आयोगाकडून एक चित्रफीत तयार करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणी, चित्रपटगृहांमध्ये तिचे प्रसारण केले जात आहे.   – प्रसन्न जोशी, कार्यकारी अभियंता, मतदान यंत्र व्यवस्थापन प्रमुख.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 12:21 am

Web Title: pmc elections 2017 3
Next Stories
1 पिंपरी चिंचवडमध्ये दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या
2 कारभारी बदलून भाजपला एकहाती सत्ता द्या – गिरीश बापट
3 जाहिरातींवर खर्च करण्यासाठी भाजपने २,२०० कोटी कुठून आणले? – काँग्रेस
Just Now!
X