चर्चेतील प्रभाग -प्रभाग क्रमांक- ७ पुणे विद्यापीठ, वाकडेवाडी

महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच चर्चेत राहिलेल्या प्रभाग क्रमांक सात, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी या प्रभागात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या; पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या रेश्मा भोसले, काँग्रेसचे दत्ता बहिरट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश निकम यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे.

mla subhash dhote
प्रियंका गांधींच्या सभेला मैदान मिळू नये म्हणून… आमदार सुभाष धोटेंच्या आरोपाने खळबळ
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
latur lok sabha marathi news, archana patil joined bjp marathi news, shivraj patil chakurkar marathi news
शिवराज पाटील यांच्या स्नुषेच्या भाजप प्रवेशाने लातूरमधील राजकीय गणिते बदलली

रेश्मा भोसले निवडणुकीच्या रिंगणात असल्या तरी खरी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे, ती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार आणि रेश्मा यांचे पती अनिल भोसले यांची. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्येच ही निवडणूक होणार आहे. अनिल भोसले यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे अजित पवार यांचेही कसब या प्रभागात पणाला लागेल यात शंका नाही. प्रभागातील बदललेल्या समीकरणांमुळे आणि नाटय़मय घडामोडींमुळे भाजप-राष्ट्रवादी असाही सामना येथे होणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये झालेल्या आघाडीनुसार या प्रभागात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. राष्ट्रवादीकडून माजी सभागृह नेता नीलेश निकम यांना राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवारी दिली. तर काँग्रेसने विद्यमान नगरसेवक दत्ता बहिरट यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. या प्रभागातून रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारली. त्यामुळे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या नातेसंबंधातून अनिल भोसले यांनी रेश्मा यांच्यासाठी भाजपची उमेदवारी अक्षरक्ष: खेचून आणली. त्याचे तीव्र राजकीय पडसाद शहरात उमटले. उमेदवारी अर्ज भरण्यातील विसंगतीमुळे अखेर न्यायालयानेच त्यांना चपराक दिली आणि त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले. भोसले यांनी बंडखोरी करत केलेला भाजप प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसच्याही जिव्हारी लागला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदार अनिल भोसले यांची ‘गद्दार’ या शब्दात संभावना केली. या पाश्र्वभूमीवर या प्रभागातील ही लढत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे.

भोसले यांच्यासाठी भाजपचे अधिकृत उमेदवार सतीश बहिरट यांनी अर्ज मागे घेतला. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यासमवेत भोसले कुटुंबीयांचे असलेले नातेसंबंध लक्षात घेता आणि भोसले या अपक्ष लढणार असल्या, तरी भाजपकडून त्यांच्यामागे पूर्ण ताकद लावली जाईल, असे सध्याचे तरी चित्र आहे. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मात्र भोसले यांच्या उमेदवारीमुळे नाराजी आहे. सध्या या प्रभागात भाजपचा अधिकृत उमेदवार नाही. त्यामुळे छुप्या पद्धतीने भोसले यांनाच निवडून आणण्यासाठी प्रयत्न होतील.

फेररचनेनंतर प्रभागात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळेच ही जागा राष्ट्रवादीला देण्यास काँग्रेसने विरोध केला होता. मैत्रीपूर्ण लढत होणार असली, तरी अजित पवार यांचीही प्रतिष्ठा येथे लागणार आहे. त्यामुळे ही लढत एका अर्थाने बहिरट आणि भोसले अशी असली तरी राष्ट्रवादीची रणनीती महत्त्वपूर्ण ठरेल.

* प्रभागात तिरंगी लढत

* काँग्रेस-भाजप-राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला

* स्थायी समितीचे माजी अध्यक्ष निवडणूक लढतीत

* दोन नगरसेवकही याच प्रभागातून

* भाजप-राष्ट्रवादी सामनाही रंगणार