मध्यवर्ती भागातील उमेदवारांकडे तुलनेने कमी संपत्ती

मालमत्तेबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये चढाओढ लागली असली तर त्यात स्थानिक ‘गाववाल्यांनी’ बाजी मारल्याचे उमेदवारांनी घोषित केलेल्या माहितीवरून दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी प्राप्तिकर विभागाकडे सादर केलेल्या विवरण पत्रांची छाननी केली असता उपगनरांमधील तसेच समाविष्ट गावातील उमेदवार ‘गब्बर’ असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच मध्यवर्ती भागातील प्रभागांमधून जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्या उमेदवारांची संपत्ती या गाववाल्यांपुढे फिकी ठरत आहे. वडगांवशेरी, औंध-बोपोडी, बाणेर-बालेवाडी, हडपसर, वारजे या भागातील उमेदवार मालामाल आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र आणि त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र सादर करण्यात आले आहे. त्याची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्राप्तिकर विभागाकडे सादर केलेल्या विवरणपत्रानुसार काही उमेदवारांकडे कोटय़वधी नव्हे, तर अब्जावधी रुपयांची संपत्ती असल्याचे दिसून आले आहे. त्यातील बहुतेक सर्व उमेदवार हे उपनगरांमधील ‘गावकरी’ आहेत.

मध्यवर्ती भागातील काही उमेदवारांची संपत्ती

’ रवींद्र धंगेकर- कसबा-५ कोटी

’  सिद्धार्थ शिरोळे- शिवाजीनगर- ७८ लाख

’  अविनाश बागवे- भवानी पेठ- १ कोटी

’ रेश्मा भोसले- शिवाजीनगर- ६४ कोटी

’  आबा बागुल- पर्वती-४ कोटी

’  सुभाष जगताप- सहकारनगर- ७ कोटी

’  बाळासाहेब बोडके- शिवाजीनगर- २ कोटी

’  मुकारी अलगुडे- शिवाजीनगर- २६ लाख

’  अरविंद शिंदे- पुणे स्टेशन- ९ कोटी

’ किशोर शिंदे- कोथरूड- १ कोटी

’  राजेंद्र वागसकर- कोरेगांव पार्क- ७ कोटी

’  अशोक हरणावळ- पर्वती दर्शन- १ कोटी


उपनगरे व गावातील काही प्रमुख उमेदवारांची संपत्ती

’ विजय भोसले- औंध-बोपोडी- १५७ कोटी

’ रेखा टिंगरे- वडगांवशेरी- १३५ कोटी

’  योगेश मुळीक- वडगांवशेरी- १०९ कोटी

’ अक्रुर कुदळे- सिंहगड रस्ता- ९९ कोटी

’ शंकर केमसे- कोथरूड- ६६ कोटी

’ श्रीकांत पाटील- औंध-बोपोडी- ४९ कोटी

’ सनी निम्हण- बाणेर- १७ कोटी

’ कैलास गायकवाड- बाणेर- ४१ कोटी

’ सचिन दोडके- वारजे- ४७ कोटी

’ संगीता गायकवाड- बाणेर- ३३ कोटी

’ चंचला कोद्रे- हडपसर- १३ कोटी

’ दत्तात्रय धनकवडे- धनकवडी- २७ कोटी

बाबूराव चांदेरे- बाणेर- ४० कोटी

प्रकाश ढोरे- औंध-बोपोडी- ४३ कोटी