महापालिकेकडून ४९२ मिळकतींवर जप्तीची कारवाई

पुणे : महापालिके ला मिळकतकरातून आतापर्यंत १ हजार ५१५ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षी याच दिवसापर्यंत मिळकतकारातून १ हजार २६२ कोटी रुपये महापालिके च्या तिजोरीत जमा झाले होते. दरम्यान, महापालिके ने ४९२ मिळकतींवर जप्तीची कारवाई के ली असून नऊ मिळकतींची लिलाव प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आर्थिक वर्षांसाठी कर भरणा करण्यासाठी सात दिवस राहिल्यामुळे सुट्टीच्या दिवशी कर भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत.

महापालिका हद्दीत समाविष्ट ११ गावांसह मिळकतींची संख्या ११ लाख ३ हजार ८९ एवढी आहे. एक एप्रिल २०२० ते २४ एप्रिल २०२१ या कालावधीत ७ लाख ८३ हजार ८७६ मिळकतदारांनी १ हजार ५१५ कोटी ६५ लाख रुपयांचा कर भरला आहे. यामध्ये ५ लाख ४५ हजार ५३३ नागरिकांनी ८०० कोटी ८२ लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने तर १ लाख ३२ हजार ७८४ मिळकतधारकांनी १७५ कोटी ५७ लाख रुपयांची रक्कम रोख स्वरूपात भरली आहे. तर १ लाख ५ हजार ५८३ मिळकतधारकांनी ५२९ कोटी १९ लाख रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे भरली आहे.

या आर्थिक वर्षांच्या सुरुवातीचे दीड महिने टाळेबंदीमुळे कर भरणा केंद्रे बंद होती. कर आकारणी आणि कर संकलन विभागातील कर्मचारीही करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कामकाजासाठी वर्ग करण्यात आले होते. त्यानंतरही नागरिकांनी ऑनलाइन कर भरण्याला प्राधान्य दिले होते. करोना संसर्गामुळे सवलतीने कर भरण्यासाठीची मुदत एक महिन्यांनी वाढविण्यात आली होती. तसेच विलंबाबाबतच्या शास्तीमध्येही एक महिना मुदतवाढ देण्यात आली होती.

सुट्टीच्या दिवशीही केंद्रे सुरू

चालू आर्थिक वर्षांतील मिळकतकर भरण्याची मुदत ३१ मार्चपर्यंतच आहे. ही मुदत संपुष्टात येण्यासाठी ७ दिवसांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे नागरिकांना कर भरता यावा यासाठी सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. सोमवार ते शनिवारी सकाळी दहा ते दुपारी चार आणि रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत केंद्रे सुरू राहणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने कर भरणा करावा, असे आवाहन महापालिके ने के ले आहे.