News Flash

टँकरटोळी सक्रिय

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठय़ासाठी महापालिके कडूनही निविदा

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठय़ासाठी महापालिके कडूनही निविदा

पुणे : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या काही भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिके च्या पाणीपुरवठा विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ही बाब शहरातील टँकरटोळीच्या पथ्यावर पडली असून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा ठेका मिळविण्यासाठी टँकरटोळीकडून दबाव टाकण्यासही सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असताना आणि पाणीपुरवठय़ाबाबत फारशा तक्रारी नसताना टँकर टोळीसाठीच ही निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

उन्हाळ्याच्या हंगामात पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन महापालिके कडून काही भागाला टँकरद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला जातो. त्यासाठी मान्यताप्राप्त ठेके दारांकडून टँकर घेतले जातात. महापालिके ने निश्चित के लेल्या ठिकाणांना या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र टँकर चालक, मालकांकडून पाणी चढय़ा दराने विकले जात असल्याच्या, पाण्याचा काळाबाजार करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने महापालिके कडे आल्या आहेत. ही वस्तुस्थिीत असतानाही ऐन मार्च मध्येच काही भागांत पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिके ने निविदा प्रक्रिया राबविली आहे. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाने स्वारगेट जलकेंद्राअंतर्गत काही भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी जवळपास एक कोटी रुपयांची निविदा काढली आहे.

येवलेवाडी आणि आसपासचा परिसर, आंबेगाव खुर्द, उंड्री, आंबेगाव बुद्रुक अशा भागाला हा पाणीपुरवठा होणार आहे. पुढील दोन ते तीन महिने या भागाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे या निविदेच्या तपशिलात नमूद करण्यात आले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणात सध्या १६.५८ अब्ज घनफू ट एवढा पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी दमदार पावसामुळे चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे शहरावर तूर्तास पाणीटंचाईचे कोणतेही सावट नाही. तसेच पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारीही अपवादानेच होत आहेत. या परिस्थितीमध्ये महापालिके ने ही टँकरद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू के ल्यामुळे ही प्रक्रिया संशयात सापडण्याची शक्यता आहे. टँकर टोळीसाठी ही प्रक्रिया सुरू झाली आहे का, अशी शंकाही यामुळे व्यक्त होत आहे.

टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची कामे मिळविण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर सातत्याने दबाव टाकला जातो, ही वस्तुस्थिती आहे. कामाचा ठेका प्राप्त झाल्यानंतर टँकर इच्छित स्थळी पोहोचत नाही, पाण्याची चढय़ा दराने विक्री होते, हद्दीबाहेर टँकर पाठविले जातात. आसपासच्या बांधकाम प्रकल्पांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे उपलब्ध करून दिले जात असल्याचे प्रकारही सातत्याने पुढे आले आहेत. यंदा ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच ही प्रक्रिया सुरू झाल्यामुळे टँकरद्वारे पाण्याचा काळाबाजार मोठय़ा प्रमाणावर होणार हे स्पष्ट होत आहे.

ऑनलाइन प्रक्रिया का नाही?

पिण्याचे पाणी महापालिके कडून दोन प्रकारे उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी निविदा काढली जाते आणि टँकरद्वारे त्या भागाला पाणीपुरवठा के ला जातो. तर दुसऱ्या प्रकारात म्हणजे खासगी ठिकाणी पिण्याचे पाणी हवे असल्यास त्यासाठी जलके ंद्रात जाऊन चलन काढावे लागत आहे. त्यामुळे जलके ंद्रातूनही पाण्याचा काळाबाजार होण्यास वाव मिळत आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन का करण्यात आलेली नाही, असा प्रश्नही त्यामुळे उपस्थित झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 1:06 am

Web Title: pmc implemented tender process for water supply in some part of pune city zws 70
Next Stories
1 लोकजागर : टँकर आवडे सर्वाना
2 कृषी अवजारांचा एकमेव कारखाना डबघाईला
3 Coronavirus : राज्यातील सगळ्या कैद्यांची तपासणी केली जाणार
Just Now!
X