रस्ते, चौक सुशोभीकरणासाठी लाखोंचा खर्च

पुणे : करोना संसर्गाच्या संकटाचा महापालिके च्या उत्पन्नावर थेट परिणाम होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे खर्चाच्या प्रस्तावांचा प्राधान्यक्रम ठरविण्याऐवजी लाखो रुपयांच्या उधळपट्टीचा घाट महापालिके च्या पथ विभागाने घातला आहे. रस्ते आणि चौक सुशोभीकरणासाठी जवळपास चाळीस लाख रुपयांचा खर्च पथ विभागाकडून करण्यात येणार असून त्याबाबतच्या निविदा पथ विभागाकडून राबविण्यात आल्या आहेत.

शहरावरील करोना संकट गडद असताना आणि आरोग्य सेवेचे सक्षमीकरण तसेच आरोग्य सेवकांना संरक्षक साधने पुरविण्याची गरज असताना सुशोभीकरणावर खर्च करण्याची महापालिके ला घाई का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. तीन चौकांसाठी हा खर्च होणार आहे.

शहरात करोना विषाणू संसर्ग मोठय़ा प्रमाणावर होत आहे. या संकटाचा सामना करण्यासठी आरोग्य सेवकांना मास्क, संरक्षक साधने यांची नितांत आवश्यकता भासत आहे. त्यामुळे महापालिके ने कं पन्या, संस्था, संघटना, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था यांनी आरोग्य तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना साहित्य पुरविले जावे, असे आवाहन महापालिके ने के ले आहे. एका बाजूला ही परिस्थिीत असताना दुसऱ्या बाजूला महापालिके चाच एक विभाग या परिस्थितीमध्ये लाखो रुपयांची उधळपट्टी करत असल्याचे पुढे आले आहे.

करोना संकटामुळे शहरातील व्यवहार ठप्प झाले आहेत. बांधकामे थांबली असून मिळतकरातूनही महापालिके ला सध्या अपेक्षित उत्पन्न तिजोरीत जमा झालेले नाही. त्यामुळे महापालिके चा आर्थिक डोलारा ढासळण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईच्या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. त्यासाठी काही लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे अंदाजपत्रातील कामे करताना अनावश्यक कामांवर कोणताही खर्च करण्यात येऊ नये, अशी सूचना महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिली आहे. तसेच खर्च कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासही सांगण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही खर्चाच्या प्रस्तावांचा किं वा कामांचा प्राधान्यक्रम न ठरविता पथ विभागाने सुमारे चाळीस लाख रुपयांची कामे काढली आहेत. यातून शहरातील तीन चौकांचे आणि काही रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मात्र या परिस्थितीमध्ये या कामांची ही गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनीही महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे यासंदर्भात तक्रार दिली असून ही कामे तातडीने थांबविण्यात यावीत, अशी मागणी वेलणकर यांनी के ली आहे.

फग्र्युसन महाविद्यालय रस्ता, आंबेगाव दत्तनगर, कात्रज गावठाण या भागातील चौकांचे सुशोभीकरण, कोंढवा खुर्द-मीठानगर तसेच रामटेकडी-सय्यदनगर प्रभागातील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती तसेच कोंढवा खुर्द-मीठानगर येथील चौकांचे सुशोभीकरण यासाठी ३८ लाख रुपयांच्या कामांची निविदा काढण्यात आली आहे. महापालिके च्या मंजूर अंदाजपत्रकातील ही कामे असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवा

महापालिके च्या मंजूर अंदाजपत्रकातील ही कामे असली तरी करोनामुळे भविष्यात आर्थिक संकट निर्माण होणार आहे. बांधकाम विकसन शुल्क आणि वस्तू तसेच सेवा कराच्या अनुदानाच्या रकमेत मोठी घट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खर्चाच्या प्रस्तावांचा प्राधान्यक्रम ठरविणे आवश्यक आहे. रस्ते आणि चौक सुशोभीकरण हे सध्याच्या परिस्थितीमध्ये नक्कीच अत्यावश्यक काम नाही. त्यामुळे ही कामे तातडीने थांबविणे आवश्यक आहे, असे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले.