04 August 2020

News Flash

शहरात विविध रस्त्यांवरील पे अ‍ॅन्ड पार्क योजना बंद

काही रस्त्यांवरील पे अ‍ॅन्ड पार्क या योजनेच्या ठेक्याची मुदत संपलेली असल्यामुळे या रस्त्यांवर चार चाकी वाहने लावण्यासाठी वाहनचालकांनी शुल्क देऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले

| April 2, 2015 03:00 am

फर्ग्युसन रस्ता तसेच जंगलीमहाराज रस्ता यासह काही रस्त्यांवरील पे अ‍ॅन्ड पार्क या योजनेच्या ठेक्याची मुदत संपलेली असल्यामुळे या रस्त्यांवर चार चाकी वाहने लावण्यासाठी वाहनचालकांनी शुल्क देऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
शहरातील फर्ग्युसन रस्ता, जंगलीमहाराज रस्ता, सोहराब हॉल ते ताडीवाला रस्ता, ढोले पाटील रस्ता ते रुबी हॉल चौक ते कोलते पाटील बिल्डिंग, नॉर्थ मेन रस्ता येथील दोन पेट्रोल पंप ते गोल्ड अ‍ॅडलॅब्ज पूल ते ब्ल्यू डायमंड रस्ता ते साधू वासवानी पूल ते येरवडा पूल, कल्याणीनगर गोल्ड अ‍ॅडलॅब्ज ते सायबेज, अलंकार चित्रपटगृह ते विश्रामगृह, ब्ल्यू नाईल चौक ते वाहतूक पोलीस कार्यालय ते स्टेट बँक, पूरम चौक अभिनव महाविद्यालय ते शनिपार ते दक्षिणमुखी मंदिर या रस्त्यांवरील पे अ‍ॅन्ड पार्क योजनेची मुदत संपली आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील पे अ‍ॅन्ड पार्क योजना बंद झाली असून या रस्त्यांवर चार चाकी वाहने लावण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क वाहनचालकांनी देऊ नये, असे पालिकेने कळवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2015 3:00 am

Web Title: pmc pay park contract consumer
टॅग Contract,Pmc
Next Stories
1 अवयवदानाविषयी डॉक्टर जनजागृती करणार
2 – नीरा देवघरकडे दुर्लक्ष, गुंजवणी मार्गी लागण्याची शक्यता
3 विद्यापीठ म्हणते.. आमच्याकडे कुलगुरूंचा बायोडेटा नाही!
Just Now!
X