पदपथावरील विक्रेत्यांनाच फायदा होण्याची शक्यता

पुणे : शहरातील बहुतेक सर्व सायकल मार्गाची दुरवस्था झालेली असताना आणि अस्तित्वातील सायकल मार्गाचा अपेक्षित वापर होत नसतानाही उधळपट्टीचा नवा सायकल मार्ग महापालिके ने शोधला आहे. स्वारगेट ते खडकवासला या दरम्यान सायकल मार्ग विकसित करण्याचा घाट महापालिके च्या पथ विभागाने घातला आहे. त्यासाठी तब्बल १ कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. मुळातच अरूंद असलेल्या नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रस्ता) सायकल मार्ग बांधणीसाठी जागा नसताना सायकल मार्ग कुठे करणार, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

पालिकेच्या पथ विभागाने स्वारगेट ते खडकवासला या दरम्यान सायकल मार्ग करण्यासाठीची निविदा प्रक्रिया राबविली आहे. १ कोटी ७४ लाख ८४ हजार ७४३ रुपयांचा हा खर्च असून ९ महिन्यात ही कामे करण्यात येणार आहेत. सायकल योजना गुंडाळलेली असतानाही त्याअंतर्गत सायकल मार्गाच्या नावाखाली होणारी ही उधळपट्टी वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिके ने सायकल वापर करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत महापालिके ने सायकल एकात्मिक विकास आराखडा के ला आहे. हा आराखडा कागदावरच आहे. त्यातच स्मार्ट सिटी आणि महापालिके च्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेली भाडेतत्त्वावरील सायकल योजनाही गुंडाळली आहे. मात्र सायकल मार्गासाठी अंदाजपत्रकात तरतूद असल्यामुळे स्वारगेट ते खडकवासला या दरम्यान सायकल मार्ग करण्यात येणार आहे.

स्वारगेटपासून खडकवासल्यापर्यंत जाणाऱ्या सिंहगड रस्त्याचा विचार केला तर सायकल मार्ग करण्यासाठी रस्त्यावर जागा नसल्याची वस्तुस्थिती आहे. राजाराम पुलापासून पुढे वडगांव उड्डाणपुलापर्यंतचे पदपथ विक्रे त्यांनी व्यापले आहेत. सायकल मार्गाच्या प्रस्तावित कामांमुळे विक्रे त्यांना मात्र नव्याने प्रशस्त जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तर नांदेड सिटीपासून खडकवासल्यापर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर सायकल मार्ग करणार तरी कु ठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सायकल मार्गाची दुरवस्था

महापालिके ने यापूर्वी केंद्राच्या तत्कालीन जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनर्निमाण योजनेअंतर्गत सायकल मार्ग उभारले. यानंतर एकात्मिक विकास आराखडय़ात गेल्या चार वर्षांत महापालिके ला जेमतेम २४ किलोमीटर लांबीचे मार्ग उभारता आल्याची वस्तुस्थिती आहे. शहरात सध्या ११० किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग आहेत. त्यांचीही दुरवस्था झाली आहे. सायकल योजना गुंडाळली गेली आहे. सायकल मार्गामध्ये सलगता नाही. मार्गावर अतिक्रमणे झाली आहेत. सातारा रस्ता, जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्ता, कर्वेनगर रस्ता, कोथरूड या भागातील सायकल मार्गाचा वापर होत नसल्याचे वेळोवेळी पुढे आले आहे. त्यानंतरही सायकल मार्ग उभारणीचा घाट घालण्यात आला आहे.

आदेशाला के राची टोपली

करोना संसर्ग कालावधीत महापालिके च्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला होता. सध्या महापालिके ला मिळकतकरातून मोठे उत्पन्न प्राप्त झाले आहे. एका बाजूला उत्पन्न वाढत असताना दुसऱ्या बाजूला उधळपट्टीही सुरू झाली आहे. यंदा अनावश्यक कामे न करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विक्रम कु मार यांनी घेतला होता. मात्र महापालिके च्या अधिकाऱ्यांनी या निर्णयाला के राची टोपली दाखविली आहे.