News Flash

केरळहून पुण्यात येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणी आगमना अगोदर ७२ तासांच्या आत करणे अनिवार्य असेल

संग्रहित छायाचित्र

पुण्यात दिवसेंदिवस करोना संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने केरळमधून पुण्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. या संदर्भात महापालिका कार्यालयातून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

केरळ राज्यातून पुणे शहरात येणार्‍या प्रवाशांना त्यांच्या आगमनाबद्दल आरटीपीसीआर चाचणी अहवाल सादर करावा लागणार आहे. ज्या प्रवाशांची ही चाचणी निगेटीव्ह आहे त्यांना त्यांच्या इच्छित स्थानी जाण्याची परवानगी असेल तर इतरांना प्रक्रियेनुसार अलगीकरणात अथवा विलगीकरणात ठेवणे आवश्यक असेल.

राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात प्रवेश करतांना केरळमधील प्रवाशांना कोविड -१९ निगेटीव्ह अहवाल आणणे अनिवार्य केले आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणी आगमना अगोदर ७२ तासांच्या आत करणे अनिवार्य असेल.

पीएमसीने १८ फेब्रुवारीपासून शहराच्या हद्दीत प्रवासांवरील निर्बंध वाढविले आहेत. गुरुवारी (१८ फेब्रुवारी) दुपारी पीएमसी आयुक्त विक्रम कुमार यांनी या निर्बंधाशी संबंधित आदेश जारी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2021 6:01 pm

Web Title: pmc says rt pcr test mandatory for travellers from kerala sbi84
Next Stories
1 Video: शेवटी ती पण एक आईच! पुण्यात कचऱ्यात टाकलेल्या बाळाला वाचवण्यासाठी महिला पोलिसाची धावाधाव
2 पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गासाठी थेट खरेदीने भूसंपादन
3 पेट्रोल शतकाच्या दिशेने
Just Now!
X