महापालिके ची योजना वादात; स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांकडून विरोध

पुणे : सिमेंट काँक्रिटचे रस्ते, चौकाचौकात बसविले जाणारे लाखो रुपयांचे बाक यासह अनेक गोष्टींत महापालिके कडून सातत्याने बेसुमार खर्च के ला जात असताना अनावश्यक योजनेसाठी उधळपट्टी करण्याचा आणखी एक प्रकार पुढे आला आहे. कोथरूड येथील महापालिके च्या उद्यानात ‘बोलणारी झाडे’ बसविण्यात येणार असून त्यासाठी तब्बल ९० लाख रुपयांचा खर्च के ला जाणार आहे.

कोथरूड येथील डहाणूकर कॉलनी परिसरातील महापालिके च्या उद्यानात ९० लाख रुपये खर्च करून तीन बोलणारी कृत्रिम झाडे बसविण्याची निविदा महापालिके ने काढली आहे. जंगलाचे महत्त्व समजावून सांगणारा एक छोटासा कार्यक्रम या अंतर्गत करण्यात येणार आहे. या तीन झाडांच्या आजूबाजूची सुमारे १०० झाडे हळुवार प्रकाशित के ली जाणार असून यातून जंगलातील विविध ऋतू आणि त्यांचे सौंदर्य दाखविण्यात येणार आहे. लहान मुलांना समजेल अशा मनोरंजन पद्धतीने पर्यावरणाचे महत्त्व झाडांच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे. या योजनेसाठी आधुनिक अशी स्वयंचलित यंत्रणा वापरण्यात येणार असून योजनेसाठी विद्युत वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. मात्र या प्रस्तावित योजनेला नागरिक, राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांकडून तीव्र विरोध सुरू झाल्यामुळे योजना वादात सापडली आहे.

करोना संकटामुळे महापालिके च्या उत्पन्नावर परिणाम झाल्यामुळे अनावश्यक तसेच दिखावू कामांवरील उधळपट्टी थांबवावी, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. अंदाजपत्रकात गृहीत धरलेल्या उत्पन्नाच्या ६० टक्के  उत्पन्नही महापालिके ला मिळालेले नाही. पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, रस्ते, सार्वजनिक वाहतूक यांसारख्या अत्यावश्यक विकासकामांसाठी प्राधान्याने खर्च होणे अपेक्षित असताना बोलणाऱ्या कृत्रिम झाडांसाठी ९० लाखांचा खर्च का के ला जातो आहे, असा प्रश्न स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सारंग यादवाडकर, कनिज सुखरानी, विजय कु ंभार, शैलाजा देशपांडे, सुहास पटवर्धन, नरेंद्र चूघ, दीपक श्रोते, डॉ. सुषाम दाते यांच्यासह अन्य प्रतिनिधींनी उपस्थित के ला. करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी थांबविण्यात यावी, अशी मागणी ही त्यांनी के ली आहे. पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्याला विरोध दर्शविला असून सत्ताधारी भाजपवर टीका के ली आहे. अनावश्यक कामांवर खर्च करण्याऐवजी आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण आणि अन्य पायाभूत विकासकामांना प्राधान्य द्यावे, असे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद के ले आहे.

उधळपट्टीचा दुसरा प्रकार

डहाणूकर कॉलनी येथील याच उद्यानात महापालिके ने डायनॉसोर प्रकल्प प्रस्तावित के ला होता. त्यासाठी १ कोटी ४४ लाख रुपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला होता. डायनॉसोर प्रकल्पाचे काम रखडले असून याच ठिकाणी आता बोलणाऱ्या झाडांची योजना आखण्यात आली असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही महापालिके ने सॅलसबरी पार्क येथील उद्यानात झाडे लावण्यासाठी १८ लाखाला एक झाड या प्रमाणे काही कोटी रुपयांच्या खर्चाचा घाट घातला होता. त्यावरून सत्ताधारी भाजपवर टीका झाल्यानंतर त्याबाबतची निविदा रद्द करण्यात आली. उधळपट्टीचा असाच प्रकार पुन्हा एकदा पुढे आला आहे.

करोना संकटामुळे महापालिके च्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अत्यावश्यक विकासकामांसाठी प्राधान्याने खर्च होणे अपेक्षित असताना दिखावू आणि बिनमहत्त्वाच्या कामांवर उधळपट्टी होत आहे. करदात्यांच्या पैशातून होणारी उधळपट्टी तातडीने थांबविण्यात यावी.

– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

जंगलाचे महत्त्व सांगणारा हा प्रकल्प आहे. उद्यानातील कोणत्याही झाडाला यामुळे धोका नाही. प्रकल्पाच्या कि मतीत सर्व खर्च समाविष्ट करण्यात आला आहे.  शहराच्या पर्यटन वैभवात भर पडणार आहे, या दृष्टीने प्रकल्पाकडे पाहणे आवश्यक आहे.

– श्रीनिवास कंदूल, विद्युत विभाग प्रमुख, महापालिका