News Flash

मोठय़ा भरुदडानंतर अखेर डिझेल खरेदी खासगी पंपांवर

डिझेलच्या ठोक खरेदीमुळे तब्बल अडीच कोटी रुपयांचा भरुदड बसल्यानंतर अखेर डिझेलची खरेदी खासगी पंपांवर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

| November 20, 2013 02:38 am

डिझेलच्या ठोक खरेदीमुळे तब्बल अडीच कोटी रुपयांचा भरुदड बसल्यानंतर अखेर डिझेलची खरेदी खासगी पंपांवर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, महापालिकेला अशाप्रकारे डिझेल द्यायला शहरातील एकाही डिझेल पंपचालकाने तयारी दर्शवली नव्हती ही माहितीही या निमित्ताने समोर आली आहे.
महापालिकेच्या वाहनांसाठी डिझेलची खरेदी अद्यापही ठोक (बल्क) पद्धतीने होत आहे. त्यामुळे दर महिन्याला महापालिकेला २५ लाख रुपयांचा भरुदड पडत असून आतापर्यंतच्या भरुदडाची रक्कम अडीच कोटी रुपये इतकी झाली आहे. त्याबाबत सजग नागरिक मंचने तक्रार केल्यानंतर अखेर शहरातील खासगी पंपांवर डिझेल खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीने एकमताने मंजूर केला.
या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती का आणि किती व्यावसायिकांनी तयारी दर्शवली होती, असा प्रश्न पृथ्वीराज सुतार यांनी स्थायी समितीमध्ये विचारल्यानंतर एकही डिझेल पंप चालकाने तयारी दर्शवली नव्हती, असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले. त्यामुळे पीएमपीच्या गाडय़ा सध्या ज्या पंपांवर डिझेल भरत आहेत, अशा सहा पंपांवर महापालिकेची वाहने डिझेल भरण्यासाठी नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेताना फक्त कचरावाहक गाडय़ाच नाहीत, तर महापालिकेच्या अन्य सर्व गाडय़ांमध्येही खासगी पंपांवरच डिझेल भरावे, अशी उपसूचना सुतार यांनी दिली आणि ती एकमताने मंजूर झाली.  
महापालिकेच्या कचरा वाहक गाडय़ा तसेच अन्य गाडय़ा मिळून गाडय़ांची संख्या ९२० आहे. या गाडय़ांसाठी महिन्याला १८ हजार लिटर डिझेल खरेदी केले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2013 2:38 am

Web Title: pmcs decision to take diesel on private pump
Next Stories
1 नेहरू स्टेडियमच्या भाडेदरात दोन ते पाच पटींनी वाढीचा निर्णय
2 वारकरी संगीत म्हणजे प्रबोधनाचे संगीत – डॉ. देखणे
3 बालकाच्या मृत्यूनंतर बिर्ला रुग्णालयात पालक व स्थानिक पुढाऱ्यांचा गोंधळ
Just Now!
X