पाच मार्गावरून ४३ गाडय़ांचे नियोजन

पुणे : विमानतळाकडे जाण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून विशेष सेवा सुरू करण्यात येणार आहे. येत्या २० ऑक्टोबरपासून ही सेवा पाच मार्गावरून सुरू होणार आहे. या सर्व गाडय़ा वातानुकू लित

असून  पीएमपी प्रशासनाकडून मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. विविध पाच मार्गावर ४३ गाडय़ा धावणार आहेत.

कोथरूड स्थानक, हडपसर, हिंजवडी, स्वारगेट आणि निगडी या मार्गावर या गाडय़ा धावणार आहेत.  या सर्व गाडय़ांची वारंवारिता २० मिनिटांची राहणार आहे. कोथरूड येथून ७ गाडय़ा, हडपसर येथून ५, हिंजवडी येथून १६, स्वारगेट येथून ७, तर निगडी येथून ८ गाडय़ा विमानतळाकडे जाणार आहेत, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात ५ मार्गावर ४३ गाडय़ांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून गाडय़ांची संख्या वाढविण्यात येईल. या गाडय़ांसाठीचे दरही निश्चित असून अंतरानुसार ५० रुपये ते १५० रुपये त्यासाठीचा दर असेल. यातून पीएमपीला उत्पन्नही मिळणार आहे, असे जगताप यांनी स्पष्ट के ले.

लोहगांव विमानतळाकडे जाण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून सहा वर्षांपूर्वी विशेष सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र वाहतूक कोंडी, गाडय़ांच्या वेळा आणि अन्य कारणांमुळे प्रवाशांचा या सेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. अलीकडे पुन्हा ही सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत होती. यासंदर्भात पीएमपी प्रशासन आणि विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठकाही झाल्या होत्या. विमानतळ प्राधिकरणाकडूनही सेवा सुरू करण्यास सकारात्मकता दर्शविण्यात आली. त्यामुळे येत्या २० ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, सेवा प्रस्तावित असल्यामुळे गाडय़ा उभ्या करण्यासाठी महापालिके ने जागा उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव पीएमपीने महापालिके च्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाला दिला आहे. जागा मिळाल्यास गाडय़ांची देखभाल दुरुस्तीही करता येणार आहे. गाडय़ांचे चार्जिग साठी विमानतळ प्राधिकरणाला सुविधा देण्यास सांगण्यात आले आहे. तर गाडय़ांची माहिती देण्यासाठी विमानतळावर पीएमपीच्या एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. या गाडय़ांसाठी स्वतंत्र मोबाइल अ‍ॅप विकसित करण्याचेही नियोजित आहे.