News Flash

बालसंगोपन कराची रक्कम पीएमपी कर्ज घेऊन परत करणार

बालसंगोपन करापोटी १९९७ पासून सन २०१२ पर्यंत जमा केलेली ४२ कोटी रुपये एवढी रक्कम पीएमपीने स्वत:साठीच वापरली आहे. वास्तविक ही रक्कम वेळोवेळी राज्य शासनाकडे जमा

| May 24, 2014 02:40 am

बालसंगोपन करापोटी आतापर्यंत ४२ कोटी रुपये गोळा करूनही ते राज्य शासनाकडे जमा न करता स्वत:साठीच वापरण्याचा प्रकार अंगलट आल्यानंतर आता ही रक्कम कर्जाच्या माध्यमातून उभी करून ती शासनाला परत करण्याचा निर्णय पीएमपी संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. ही रक्कम पुणे व पिंपरी महापालिकेकडून मिळू शकते का याचीही चाचपणी केली जाणार आहे.
पीएमपीने घेतलेल्या या निर्णयाची माहिती संचालक प्रशांत जगताप यांनी शुक्रवारी दिली. पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय आयत्यावेळचा विषय म्हणून दाखल करण्यात आला होता. बालसंगोपन करापोटी १९९७ पासून सन २०१२ पर्यंत जमा केलेली ४२ कोटी रुपये एवढी रक्कम पीएमपीने स्वत:साठीच वापरली आहे. वास्तविक ही रक्कम वेळोवेळी राज्य शासनाकडे जमा करणे आवश्यक होते. हा कर प्रवाशांकडून गोळा केला जातो. मात्र तो शासनाकडे भरला जात नाही. या प्रकाराबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून न्यायालयाने या निधीच्या वापराचा तपशील पीएमपीकडे मागितला आहे. हा निधी कसा परत करणार याचे प्रतिज्ञापत्र पीएमपीला १६ जून रोजी न्यायालयात सादर करावे लागणार आहे. त्यामुळे प्रतिज्ञापत्रात काय म्हणणे सादर करायचे त्याबाबत निर्णय करण्याचा विषय संचालकांपुढे ठेवण्यात आला होता.
ही रक्कम शासनाचीच असल्यामुळे ती कोणत्याही परिस्थितीत परत करावीच लागणार आहे. त्यामुळे ती कशी परत करता येईल याचा विचार करा, अशी सूचना जगताप यांनी बैठकीत केली. ही रक्कम पुणे व पिंपरी महापालिकांकडून मिळवता येईल का असा विचार बैठकीत झाला. त्यानुसार दोन्ही आयुक्तांना पत्र पाठवून विचारणा करावी, असे बैठकीत निश्चित करण्यात आले. महापालिकांनी नकार दिल्यास पीएमपीने बँकेमार्फत कर्ज घ्यावे व त्याला दोन्ही महापालिकांची हमी घ्यावी असेही ठरवण्यात आले. रक्कम परत करण्याबाबत दोन्ही महापालिकांशी संपर्क साधला आहे. त्यांच्याकडून नकार आल्यास कर्ज घेऊन ही रक्कम उभी केली जाईल, असे शपथपत्र न्यायालयाला द्यावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
राज्य शासनाच्या धोरणानुसार पीएमपीतर्फे प्रवाशांकडून बालसंगोपनकर वसूल केला जात आहे. दोन रुपयांपेक्षा कमी किमतीच्या तिकिटावर १० पैसे आणि त्यावरील तिकिटावर १५ पैसे अशाप्रकारे हा कर गोळा केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 2:40 am

Web Title: pmpl child upbringing tax state govt
Next Stories
1 सिंहगड तीनशे वर्षांनंतर पुन्हा ‘जिवंत’ होणार! ; दुर्गदिनानिमित्त १ जूनला शिवकाल साकारणार
2 त्यांच्या जिद्दीने बांधले पुन्हा ‘मकालू’वर दोर
3 शिक्षण मंडळ अध्यक्षपदाचा रवी चौधरी यांचा राजीनामा
Just Now!
X