News Flash

Video : पुण्यात पीएमपीएमएल चालक-वाहकांची दादागिरी, दोघांवरही गुन्हा दाखल

कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा नवा नाही.

pune citizen, pmpml app, tukaram munde ,pmpml
पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांची दादागिरी नवीन नाही. (प्रातिनिधीक छायाचित्र)

पुणे शहरातील पीएमपीएमएल बस वाहक आणि चालकाने मिळून वृद्ध प्रवाशाला धक्काबुक्की करत त्याच्यावर दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. बस स्थानकावर पीएमपीएमएलचीची बस का थांबवली नाही, असा जाब विचारणाऱ्या जेष्ठ नागरिकावर चालक आणि वाहकाने दमदाटी केली. याप्रकरणी संबंधित ज्येष्ठ नागरिकाने बंडगार्डन पोलिसांमध्ये दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चालक आणि वाहकावर अदखल पात्र गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील नवीन जिल्हाधिकारी इमारतीसमोर असणाऱ्या बस स्थानकावर मंगळवारी सांयकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. इरशाद पिरजादे (वय ६६) खडकीला जाण्यासाठी बस स्थानकावर उभे होते. तब्बल पाऊण तासानंतर बस आली, पण हात दाखवून देखील चालकाने बस थांबवली नाही. पिरजादे यांनी स्थानकापासून थोड्या अंतरावर धावत जात बसच्यासमोर उभे राहण्याची जोखीम स्वीकारुन चालकाला बस थांबवण्यास भाग पाडले. त्यांनी चालक आणि वाहकास स्थानकावर बस का थांबवली नाही? याचा जाब विचारला. मात्र वाहकाने खाली उतरून पिरजादे यांच्यावर आरेरावी करण्यास सुरुवात केली. काय करायचे असेल तर करून घे, अशा भाषेचा वापर करण्यात आला. तसेच त्यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली. याप्रकरणी पिरजादे यांनी बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे चालक आणि वाहकाच्या विरोधात तक्रार दाखल केली.

पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी यापूर्वी बेशिस्त कर्मचारी वर्गावर कारवाई केली आहे. एवढेच नाही तर वाहक आणि चालकांनी प्रवाशांसोबत चांगला संवाद साधावा, अशा सूचनाही दिल्या आहेत. तसेच प्रत्येक स्थानकावर बस थांबवा, असे आदेशही मुंढे यांनी काढले होते. मात्र त्यांच्या आदेशाला कर्मचारी वर्गाने केराची टोपली दाखवण्याचे काम केले. आता या बेशिस्त कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणाारे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2017 5:32 pm

Web Title: pmpml bus conductor and driver held for aggressive behaviour
Next Stories
1 गणेशोत्सवावर जीएसटीचे विघ्न; मूर्तीकार संभ्रमात
2 पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; एकाचा जागीच मृत्यू
3 पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग, हडपसरमधील घटना
Just Now!
X