News Flash

पीएमपीच्या बडतर्फ चालकांचे पिंपरी-चिंचवडच्या महापौरांना साकडे

मुंढे आल्यापासून काम मिळणे बंद झाले. उलट त्यांनीच गैरहजेरीचा ठपका ठेवला

पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी केलेली बडतर्फीची कारवाई अयोग्य असल्याची तक्रार यावेळी बसचालकांनी महापौर नितीन काळजे यांच्यासमोर मांडली.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएलच्या बडतर्फ बसचालकांनी पिंपरी चिंचवडच्या महापौरांची भेट घेतली. पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी केलेली बडतर्फीची कारवाई अयोग्य असल्याची तक्रार यावेळी बसचालकांनी महापौर नितीन काळजे यांच्यासमोर मांडली. नोकरीवर पुन्हा रुजू करावे यासाठी चालकांनी महापौर आणि पीएमपीएमएलचे संचालक काळजे यांना साकडे घातले.

गेल्या अनेक वर्षांपासून या १५८ बदली चालकांना वेळेवर बदली मिळत होती. मात्र तुकाराम मुंढे आल्यापासून काम मिळणे बंद झाले आणि उलट त्यांनीच गैरहजेरीचा ठपका ठेवला, असा आरोप चालकांनी केलाय. तर महापौर काळजे यांनी देखील प्रशासनाच्या चुकीचे चालकांना बळी ठरवू नये अशी मागणी केली. याविषयी बैठक घेऊन तुकाराम मुंढे याना पत्र देणार असल्याचे यावेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 6:54 pm

Web Title: pmpmls suspended bus drivers meet pimpri chinchwads mayor
Next Stories
1 विधानपरिषदेचे माजी सभापती ना. सी. फरांदे यांचे निधन
2 दौंडमध्ये एसआरपीएफ जवानाच्या गोळीबारात तीन जण ठार
3 बांधकाम व्यावसायिकाचा खून करणाऱ्यांची नावे निष्पन्न
Just Now!
X