हेमा लेले यांची भावना
आपली संवेदना इतरांची होण्याचे सुख केवळ कवितेतूनच मिळते. एका अर्थाने कविता ही माझ्या जीवनाचे अध्यात्म आहे, अशी भावना प्रसिद्ध कवयित्री हेमा लेले यांनी सोमवारी व्यक्त केली.
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ कवयित्री डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या हस्ते हेमा लेले यांना काव्य जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. प्रसिद्ध समीक्षक डॉ. नीलिमा गुंडी, प्रमोद आडकर आणि भारत देसडला या वेळी उपस्थित होते.
आयुष्यामध्ये आनंदाच्या वेळी आणि संकटाच्या क्षणीदेखील कवितेनेच मार्गदर्शन केले, असे सांगून हेमा लेले म्हणाल्या, माणसामध्ये वेडेपणाचा उन्माद असल्याशिवाय निर्मिती घडत नाही. माझी कविता कोणत्याही पंथाची नाही. ही कविता स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी असली तरी ती स्त्रीवादी नाही. जगण्यावर प्रेम करणारे जीवनवादी लेखन करण्यावर माझा विश्वास आहे. जे सांगायचे ते नेमकेपणाने सांगता येत नसेल तर, मौन पाळणे योग्य अशीच माझी धारणा आहे.
सुंदरतेचा ध्यास असलेली कवयित्री असा हेमा लेले यांचा गौरव करून विविध प्रतिमांनी त्यांनी कवितेचे सौंदर्य खुलवले आहे, असे डॉ. धोंगडे यांनी सांगितले. स्त्रीवाद म्हणजे पुरुषांचा द्वेष नव्हे. तर, प्रेमामध्ये विरघळून जाण्यापेक्षाही आपल्यातील स्त्रीत्व आणि स्वत्व जपणे म्हणजे स्त्रीवाद, असेही त्यांनी सांगितले. मुलांचे भावविश्व शुष्क राहू नये यासाठी हेमा लेले यांनी ‘चिमणगाणी’ कार्यक्रमाची निर्मिती केली, असे डॉ. गुंडी यांनी सांगितले. प्रभा सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.

 

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…