News Flash

पुण्यातील भाजपा नगरसेविकेच्या घरी चोरी, नऊ तोळे सोनं लांबवलं

चोराकडून सोनं खरेदी करणाऱ्या कामाक्षी जेम्स अँड ज्वेलर्सचे मालक देवराय रेवणकर यांना देखील या प्रकरणी अटक

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या भाजपा नगरसेविका ज्योती किशोर गोसावी यांच्या घरातून नऊ तोळे सोन्यावर चोरांनी डल्ला मारला.  या घटनेतील महिला आरोपीला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. हर्षा सुरेश शितोळे (वय ५३ रा. पर्वती)  या महिलेस अटक करण्यात आली आहे.

सिंहगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोडवरील हिंगणे खुर्द येथे ज्योती किशोर गोसावी यांचा पार्थ बंगला आहे. ज्योती गोसावी यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना त्यांच्या घरातील नऊ तोळे सोने चोरीला गेल्याची घटना घडली. ही चोरी एका महिलेने केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले. मात्र त्या महिलेने तोंडाला रुमाल बांधले असल्याने तपास करताना अनेक अडचणी आल्या. अखेर या परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आल्यावर हर्षा शितोळे या महिलेने चोरी केल्याचे स्पष्ट झाले. संबंधित महिलेकडे कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याचे कबुली दिली असून यापूर्वी देखील या महिलेवर शहरातील विविध भागात १५ गुन्हे असल्याचे तपासात पुढे आले आहे. तर हे नऊ तोळे सोने कामाक्षी जेम्स अँड ज्वेलर्सचे मालक देवराय गणपती रेवणकर यांनी विकत घेतले आहे. त्यांना देखील या प्रकरणी अटक करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 1:59 pm

Web Title: police arrested a thief who stole gold from bjp corporators home
Next Stories
1 पाण्याच्या लेखापरीक्षणाचे पालिकेला वावडे
2 अवैध बांधकामांची समस्या कायम
3 कृषी पर्यटन धोरणाचा मसुदा चार वर्षांपासून प्रलंबित
Just Now!
X