10 July 2020

News Flash

पुणे: महागड्या रेसर बाईक चोरणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी साडेआठ लाखांच्या रेसर बाईक या तरुणांकडून जप्त केल्या आहेत

महागड्या रेसर बाईक चोरणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना गुन्हे शाखा १ ने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून साडेआठ लाखांच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत.  या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून गाड्या चोरून महाविद्यालयात घेऊन जात आणि घरी परत येत असताना वेगवेगळ्या सोसायटीमध्ये चोरीच्या गाड्या लावत अशी पोलिसांनी दिली आहे.

अतिक वाहिद शेख( वय-१९)  वाशीम वाहिद शेख (वय- २१)  राजेश दत्तात्रेय भोसले (वय-२०) प्रवीण उत्तम कांबळे (वय-१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील शेख आडनावाचे आरोपी हे तर सख्खे भाऊ आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हे शाखा एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्त सुरू करण्यात आली होती. तेव्हा, पोलीस कर्मचारी विजय मोरे यांना यासंदर्भातली माहिती मिळाली की, सांगवी, येरवडा, लोहगाव येथे बनावट नंबर प्लेटच्या रेसर गाड्या असून त्यांच्याकडे कागदपत्रे नसल्याचे सांगण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक लांडगे यांचे पथक हे त्यांच्या मागावर गेले आणि संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून महागड्या रेसर, आणि मोपेड दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदर च्या दुचाकी या निगडी, दिघी आणि येरवडा येथून चोरल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. आरोपी हे मौज मजा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी महागड्या गाड्या चोरत असत. दरम्यान, महाविद्यालयातून आल्यानंतर संबंधित दुचाकी या वेगवेगळ्या सोसायटीमध्ये लावत किंवा मित्रांच्या घरी ठेवत.

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड, प्रमोद लांडे, शिवाजी कानडे, मनोजकुमार कमले, विजय मोरे, गणेश सावंत, प्रवीण पाटील, यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2019 4:11 pm

Web Title: police arrested bike thieves in pimpri all are college students scj 81
Next Stories
1 पुणे: मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी 270 किलोचा हार
2 लष्करी प्रशिक्षणातील संधींसाठी पंतप्रधानांना साकडे
3 महसूल विभागाच्या ताब्यातून वाळूचा ट्रक पळवणारा गजाआड
Just Now!
X