News Flash

पिंपरी : RTO फिटनेस, वाहन इन्शुरन्ससारखी बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी जेरबंद

800 व्यक्तींना बनवून दिले बनावट कागदपत्रे , 1 लाख 21 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने आशीर्वाद कॅफेवर छापा टाकून टोळीला अटक केली आहे. ही टोळी आरटीओ फिटनेस, टॅक्स पावती, वाहन इन्शुरन्स, पोलीस क्लीअरन्स सर्टिफिकेट अशी बनावट कागदपत्रे तयार करत होती, तसेच आतापर्यंत आठशे व्यक्तींना त्यांनी बनावट कागदपत्रे बनवून दिल्याचं समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेवाडीतील आशीर्वाद कॅफेवर छापा टाकून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आशीर्वाद कॅफेचा मालक राहुल गौड हा त्याच्या इतर पाच साथीदारांसह बनावट कागद पत्र तयार करत होता. यात, आरटीओ फिटनेस, टॅक्स पावती, वाहन इन्शुरन्स, पोलीस क्लीअरन्स सर्टिफिकेट अशी बनावट कागदपत्रे संगणकावर बनवली जात होती. आरोपी राहुल ज्या व्यक्तीला बनावट कागदपत्रे बनवून घ्यायची आहेत त्यांच्याशी संपर्क करुन व्हाट्सऍपवर नाव आणि पत्ता घ्यायचा, त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करून दिली जायची. याप्रकरणी अद्याप दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांच्या पथकाने केली .

याप्रकरणी मुख्य आरोपी राहुल गौड, बालाजी गोरख बाबर, तुकाराम अर्जुन मगर, प्रवीण दशरथ दळवे यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून 1 लाख 21 हजारांचा मुद्देमाल, बनावट कागदपत्रे तयार करण्याचे साहित्य, प्रिंटर, पेन ड्राइव्ह, झेरॉक्स मशीन यासह काही सर्टिफिकेट, एक मोबाईल आणि रबरी स्टॅम्प जप्त केले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 3:27 pm

Web Title: police arrested gang in pimpri chinchwad for making fake documents certificates kjp 91 sas 89
Next Stories
1 पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील दोन्ही अर्ज न्यायालयाने फेटाळले
2 पुणे : समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
3 पुण्यातील ‘ओशो’ आश्रमाचा भूखंड विकण्याची तयारी
Just Now!
X