News Flash

पुणे : पिस्तुल विकणाऱ्या आरोपीसह खरेदी करणारा पोलिसांच्या जाळ्यात

दोन गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि कार जप्त

पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या आरोपीसह पिस्तूल खरेदी करणाऱ्याला निगडी पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून ३ लाख ९० हजार रुपये किंमतीचे दोन गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि कार जप्त करण्यात आली आहे. अविनाश उर्फ सोन्या राजेंद्र जाधव (वय २८) आणि परशुराम उर्फ बाब करू गडदे (वय २४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पिस्तुलाची खरेदी विक्री होणार असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली होती. आरोपी अविनाश जाधव हा गावठी पिस्तुल विक्रीसाठी आकुर्डी येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी आकुर्डी येथील परिसरात सापळा रचला. सोन्या जाधव रिक्षातून आला आणि संशयितरित्या कारमध्ये बसला. तेव्हाच, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.  दोघांची झडती घेतली असता दोन गावठी पिस्तुल आणि  चार जिवंत काडतुसे असा ऐवज निगडी पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, पोलीस कर्मचारी प्रवीण मुळूक, दिलीप कदम, शाम शिंदे, प्रीतम वाघ, नामदेव वडेकर, शंकर बांगर, किशोर पढेर, विनोद व्होनमाने, विलास केकाण, विजय बोडके, भूपेंद्र चौधरी यांच्या पथकाने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 7:22 am

Web Title: police arrested two people in illegal gun deal bmh 90
Next Stories
1 ऑनलाइन फसवणुकीचे सत्र कायम
2 गुन्हे वृत्त ; परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलेला गंडा
3 रेल्वे गाडीवर दरोडय़ाचा प्रयत्न; चोरटय़ांची टोळी जेरबंद
Just Now!
X