News Flash

चिखलीत गस्त घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की

विक्की खवळे या सराईत गुन्हेगाराने पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की केली.

चिखली येथील मोरेवस्तीमध्ये पोलीस गस्त घालत असताना सराईत गुन्हेगार विक्की खवळे व नातेवाईकांनी पोलीस गाडीला अडवून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. ही घटना सकाळी ११ वाजता घडली.  विक्की खवळे, सुमन खवळे, अंकिता ससाणे, सुरेखा ससाणे, मीना खवळे, बाबा खवळे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. सोनवणे यांचे पथक गस्त घालत असताना विक्की खवळे याने गाडी अडवून पोलिसांशी हुज्जत घातली आणि पोलीस गाडीतून उतरताच धक्काबुकी केली. तसेच पोलीस कारवाई करण्यास सुरुवात करताच शिवीगाळ केली. या प्रकरणी विक्की खवळे सह नातेवाईकांना ताब्यात घेतले. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एम. पवार हे करत आहेत. विक्की खवळे याला १ जानेवारीला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 7:20 pm

Web Title: police assulted pune pimpri chinchwad chikhali maharashtra police sonawane
Next Stories
1 आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरात वीस टक्क्य़ांनी वाढ
2 भाजपच्या तीन हजार यादी प्रमुखांना निवडणुकीचे धडे!
3 पालिकेच्या संकेतस्थळावर माहिती अधिकाराला ठेंगा
Just Now!
X