27 September 2020

News Flash

पुण्यात प्रथमच अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धा

एसआरपीएफचे समादेशक सारंग आवाड, अमोल तांबे या प्रसंगी उपस्थित होते.

पोलीस बँडच्या सुरावटी ऐकण्याची संधी!

देशभक्तिपर गीतांसह विविध प्रकाराच्या सुरेल धून ऐकण्याची संधी अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेच्या निमित्ताने पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील रामटेकडी परिसरात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर १० ते १५ जून या कालावधीत पोलीस बँड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत देशभरातील २६ संघ सहभागी होणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन १० मे रोजी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार आहे, तर समारोप १५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल, अशी माहिती राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपीएफ) पोलीस महानिरीक्षक डॉ. सुरेशकुमार मेखला यांनी बुधवारी दिली. एसआरपीएफचे समादेशक सारंग आवाड, अमोल तांबे या प्रसंगी उपस्थित होते.

अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्याचा मान महाराष्ट्र पोलीस दलाला पहिल्यांदा मिळाला आहे. एसआरपीएफच्या कवायत मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. देशातील विविध राज्यांतील १९ पोलीस बँड पथके या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तसेच निमलष्करी दलाची सात पथके सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत एकूण मिळून १,६१८ स्पर्धक सहभागी होणार आहेत. ब्रास, बिगुल आणि पाइप अशा तीन प्रकारांमध्ये बँड वादन सादर करण्यात येणार आहे. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या संघात एसआरपीएफ आणि मुंबई पोलीस दलातून ७६ जणांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांचा संघ तीनही प्रकारांत सहभाग नोंदविणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त पदके मिळविण्याचा महाराष्ट्र पोलिसांचा संघाचा प्रयत्न राहील, असे डॉ. मेखला यांनी सांगितले.

स्पर्धेची वैशिष्टय़े

  • स्पर्धेचा कालावधी १० ते १५ जून
  • स्पर्धा आयोजित करण्याचा मान महाराष्ट्र पोलीस दलाला पहिल्यांदा
  • स्पर्धा एसआरपीएफच्या कवायत मैदानावर
  • विविध राज्यांतील १९ पोलीस बँड पथके स्पर्धेसाठी येणार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2016 5:09 am

Web Title: police band competition in pune
Next Stories
1 पिंपरीत व्यक्तिपूजा हेच राजकारणाचे सूत्र; पक्षनिष्ठा खुंटीला
2 ‘स्मार्ट पुण्यासाठी स्मार्ट पोलीस’
3 प्रभात फिल्म कंपनी’च्या संस्थापकांना अभिवादन
Just Now!
X