26 January 2021

News Flash

पुणे – पोलीस हवालदाराची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यात एका पोलीस हवालदाराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे

पुण्यात पोलीस हवालदार उमेश राऊत यांची आत्महत्या

पुण्यात एका पोलीस हवालदाराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. उमेश राऊत डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. उमेश राऊत (४५) स्वारगेट पोलीस लाइन बिल्डिंग क्रमांक सहामध्ये वास्तव्य करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये उमेश राऊत हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे कोर्टाची ड्युटी असायची. बुधवारीदेखील ते नेहमीप्रमाणे कामावर गेले. त्यानंतर रात्री घरी आल्यावर त्यांच्यात आणि पत्नीमध्ये भांडण झाले. त्यांची पत्नी भांडण झाल्यावर घराबाहेर जाऊन बसली होती. त्यावेळी उमेश बाथरूममध्ये गेले. बराच वेळ ते बाहेर न आल्याने आवाज देण्यात आला. मात्र काहीच प्रतिसाद न आल्याने अखेड दरवाजा तोडण्यात आला. यावेळी उमेश यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल नेले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. स्वारगेट पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 10:35 am

Web Title: police constable commit suicide in pune
Next Stories
1 मराठा आरक्षण : दारू विक्री केंद्रे, परमिट रूम बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
2 भारताला समांतर ऊर्जा स्रोतांचा शोध घ्यावाच लागेल
3 मंडप धोरण यंदाही कागदावरच?
Just Now!
X